आजकालच्या धकाधकीच्या युगात नोकरी, कुटुंबाची जबाबदारी यातून स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्याचबरोबर लोकांचे खानपानही इतके खराब झाले आहे की त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि त्वचेवर दिसू लागला आहे. यामुळेच आजकाल कमी वयातच चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ लागते. त्वचेवर सुरकुत्या आणि वयाचा परिणाम वेळेआधीच दिसू लागतो आणि चेहरा निस्तेज होऊ लागतो. स्त्रिया देखील चेहरा सुंदर करण्यासाठी अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतात, परंतु कुठेतरी त्याचे दुष्परिणाम देखील समोर येतात आणि त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य गमावू लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी या दोन व्हिटॅमिनचे आहारात समावेश करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आहारात काही आवश्यक जीवनसत्त्वे घेतल्यास त्वचा निरोगी आणि तरुण दिसते. कारण शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे काळे डाग, लालसरपणा, सुरकुत्या, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर कोरडेपणाच्या खुणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हालाही तुमची त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवायची असेल तर या दोन व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश करा.

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी हे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी आवश्यक आहे. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित २००७ च्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन सी समृद्ध आहारामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या दूर होतात आणि त्वचेचा रंग सुधारतो. व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण होते, तसेच त्वचा तरुण आणि सुंदर दिसते. व्हिटॅमिन सी त्वचेचे कोलेजन उत्पादन वाढवते, तसेच त्वचा मुलायम बनवते. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स घेतल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई हे असे जीवनसत्व आहे जे अँटिऑक्सिडंट म्हणून आपल्या चेहर्‍यावर कार्य करते. तसेच तुम्ही नियमित तुमच्या आहारात व्हिटॅमिन ई चे सेवन केल्यास हृदयविकार, काहींना कर्करोग, दृष्टी समस्या आणि मेंदूचे विकार यांचा धोका कमी होतो, तसेच त्वचा निरोगी राहते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे त्वचेवर चट्टे दिसू लागतात, तसेच त्वचेवर सुरकुत्या किंवा वृद्धत्वही दिसू लागते. आहारात व्हिटॅमिन ईचे सेवन केल्यास वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो. तसेच व्हिटॅमिन ई त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you want to get rid of wrinkles so include these 2 vitamin in your diet scsm
Show comments