Air Purifiers : सध्या दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही विषारी हवा लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, मानसिक आजार यांसारखे गंभीर आजार लोकांना होत आहेत. प्रदूषणामुळे हवेतील नायट्रोजन, सल्फर आणि कार्बनचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेताना त्रास होत आहे. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या घरात एअर प्युरिफायर लावत आहेत जेणेकरून घरातील हवा शुद्ध आणि स्वच्छ व्हावी आणि लोकांना घरात मोकळा श्वास घेता येईल.

घरातील हवा स्वच्छ आणि ताजी ठेवण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर केला जातो. हे धूळ, धूर, बॅक्टेरिया, विषाणू आणि इतर हानिकारक कण काढून टाकण्यास मदत करते. पण, एअर प्युरिफायर वापरताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया

slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
tapeworms pills effect on body
Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?
video shows sofa Made From Broken Chairs
VIRAL VIDEO : तुटलेल्या गोष्टी जोडण्याची कला, दोन माणसं बसतील असा बनवला सोफा; पाहा तरुणांचा जुगाड
How to properly clean your chopping board
Chopping Board : तुम्हीसुद्धा भाज्या कापण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरता का? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
wheat flour get moldy if it is stored for a long
गव्हाचे पीठ जास्त दिवस साठवल्यास किडे होतात? ‘या’ सोप्या उपायांनी जास्त दिवस टिकू शकेल पीठ
season do hair lice occur
केसातील उवा कोणत्या ऋतूमध्ये होतात? त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला उपाय…
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…

स्वच्छतेची काळजी घ्या
एअर प्युरिफायर जे घाण, धूळ, बॅक्टेरिया, विषाणू आणि इतर प्रदूषकांपासून घरातील हवा शक्तिशालीपणे फिल्टर करते. श्वासोच्छवासाची गुणवत्ता सुधारण्यात आणि फुफ्फुसांचे आरोग्य राखण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे प्युरिफायर रोज स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. फिल्टर वेळोवेळी बदलले पाहिजेत आणि संपूर्ण युनिट पद्धतशीरपणे साफ केले पाहिजे. प्युरिफायरच्या योग्य कार्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

हेही वाचा – Winter Special : स्वेटर, कानटोपी, मफलर…लोकरीच्या कपड्यांचा विचित्र वास येतोय? मग सोप्या टिप्स वापरा, न धुता गायब होईल दुर्गंध

खोलीनुसार एअर प्युरिफायर निवडा
एअर प्युरिफायर निवडताना, सर्वप्रथम आपण आपल्या खोलीचा आकार आणि क्षेत्रफळ लक्षात घेतले पाहिजे. मोठ्या खोल्यांसाठी, मोठ्या आकाराचे प्युरिफायर आवश्यक आहेत जे संपूर्ण खोलीला प्रदूषणमुक्त हवा देऊ शकतात. परंतु खूप मोठ्या आकाराचे प्युरिफायर लहान खोल्यांसाठी योग्य नाही कारण एका ठिकाणी हवेच्या अधिक गतीमुळे हवेचा प्रवाह असंतुलित होऊ शकतो. म्हणून, खोलीसाठी योग्य आकाराचे प्युरिफायर निवडून सर्वोत्तम वापर केला जाऊ शकतो.

हेही वाचा – संत्र्याची साल कचऱ्यात टाकून देण्याची चूक करू नका? किचनपासून गार्डनपर्यंत ‘असा’ करू शकता त्याचा वापर

प्युरिफायर योग्य ठिकाणी ठेवा
एअर प्युरिफायर ठेवताना खोलीच्या कोणत्या कोपऱ्यात ठेवला जातोय का याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. प्युरिफायर खोलीच्या मध्यभागी किंवा अशा ठिकाणी असला पाहिजे जेथून ते संपूर्ण खोलीमध्ये सहजपणे काम करू शकेल. जर आपण प्युरिफायर खोलीच्या भिंतीसमोर किंवा कोपऱ्यात बसवले तर ते फक्त आजूबाजूच्या परिसरातच काम करू शकेल. यामुळे संपूर्ण खोलीतील हवा स्वच्छ करण्यात अडचण येईल.