Married Life : लग्न हे असं बंधन आहे, ज्या बंधनात अडकल्यानंतर दोन व्यक्तींचे नवे आयुष्य सुरू होते. सुरुवातीला हा नवा संसार गोड वाटतो, पण कालांतराने नात्यातील गोडवा कमी होण्याची शक्यता असते. अनेक गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. कधी कधी परिस्थिती इतकी बिघडते, की जोडीदार वारंवार घटस्फोटाची धमकी देऊ शकतो. अशा वेळी नातं सांभाळणे गरजेचे असते. आज आम्ही या विषयीच सविस्तर माहिती देणार आहोत.
- जर तुमचा जोडीदार वारंवार घटस्फोटाची धमकी देत असेल तर घाबरू नका. शांतपणे विचार करा. जोडीदाराबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधा आणि त्यांच्या मनातील घालमेल समजून घ्या. घटस्फोटाच्या धमकीमागील कारण शोधा आणि नात्यातील अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा : Breakup Signs : जर ही लक्षणे दिसत असतील, तर तुमचे नाते फार काळ टिकणार नाही; वेळीच व्हा सावध …
- जोडीदाराची मनस्थिती समजून त्याच्याबरोबर बोला. जर जोडीदार चर्चा करण्यास उत्सुक असेल, तर त्याचे म्हणणे नीट ऐकून घ्या; त्यानंतर तुमच्या मनातील भावना सांगा. तुम्हाला हे नातं जपायचं आहे, हे त्यांना बोलण्यातून दाखवा.
- जर तुमचा जोडीदार तणावात असेल किंवा त्यांना कोणत्या समस्या अथवा अडचणी असतील तर त्या समजून घ्या. जर तुम्ही एखादी चूक केली असेल तर त्वरीत माफी मागा किंवा गैरसमज निर्माण झाले असतील तर दूर करा. यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्याने तुमचे नाते सुरू करू शकता.
हेही वाचा : Relationship Tips : जोडीदारबरोबर असतानाही एकटेपणा जाणवतो, ‘ही’ असू शकतात कारणे
- नात्यातील गोडवा निर्माण करा, कारण यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या शारीरिक आणि भावनिकरित्या जवळ जाऊ शकता. जोडीदाराविषयी तुमची काळजी, प्रेम आणि जिव्हाळा तुम्हाला घटस्फोटापासून दूर ठेवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे जोडीदाराजवळ आपल्या भावना व्यक्त करा आणि त्याला जास्तीत जास्त वेळ द्या.
- खूप प्रयत्न करूनही जोडीदार वारंवार तुम्हाला घटस्फोटाची धमकी देत असेल तर एक्सपर्टची मदत घ्या. प्रोफेशनल रिलेशनशिप कोचची मदत घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही तुमचं नातं सुधारू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)