– डॉ. अनुजा अग्रवाल (एमएससी, आरडी)

आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्य तेल वापरले जाते. यामध्ये मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफुलाचे तेल आणि खोबरेल तेल यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य तेलाचा वापर आपल्या येथील खाद्यसंस्कृतीमध्ये परंपरेने चालत आला आहे. परंतु, परंपरेने चालत आलेल्या या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांपासून तयार होणाऱ्या तेलाचे वेगवेगळे फायदे असतात. मात्र या फायद्यांकडे आपण अनेकदा दूर्लक्ष करतो.

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
Sago French Fries
चटपटीत खावंसं वाटतंय? मग बनवा साबुदाणा फ्रेंच फ्राईज; ही घ्या सोपी रेसिपी…
Make nutritious rajgira halwa in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा पौष्टिक राजगिऱ्याचा शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Which metal vessel is used to boil
दूध उकळवण्यासह पिण्यासाठी कोणत्या धातूच्या भांड्याचा वापर केला जातो?

तेल, तसेच घरात शिजवलेल्या अन्नात अढळणारे मेद (फॅट्स) आणि स्थानिक उपाराहरगृहात मिळणारे अन्न तसेच पाकिटबंद अन्नातील अढळणारे मेद यांचा समावेश असलेल्या मेदाचे सेवन दिवसाला १० टीस्पूनपेक्षा अधिक असता कामा नये, असे हार्वर्ड विद्यापीठाशी संबंधित ‘ईट लॅन्सेट’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. अर्ध्याहून अधिक मेद/तेल हे वनस्पती स्त्रोतांकडून मिळणाऱ्या विविध असंतृप्त तेल स्त्रोतांपासून मिळवणे आवश्यक आहे. अहवालात धान्य, वनस्पती प्रथिने (बिया, मसूर, डाळी), निवडक मांस आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि भाज्या यांचा समावेश असलेल्या संतुलित आणि परिपूर्ण अशा पारंपरिक भारतीय आहारावर भर देण्यात आला असला तरी वनस्पतीआधारीत मेदावर देण्यात आलेला भरही लक्षणीय आहे. प्राण्यांपासून मिळवलेल्या अन्नाच्याऐवजी (मांसाहास) वनस्पतीजन्य अन्नाचा अधिक समावेश असलेला आहार आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाभकारक आहे.

लाभकारक मेदांनी युक्त अशी बहुतांश प्रकारची खाद्य तेलं ही हृदयासाठी चांगली असतात. वनस्पतीजन्य खाद्य तेलांमधून शरीरामधील पेशींमधील कार्य सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी आवश्यक अशी पोषक तत्त्वे मिळतात. संतृप्त मेदांच्या (Saturated Fats) जागी असंतृप्त मेदाचा (Unsaturated Fats) स्वीकार केल्यास असामान्य असे आरोग्यविषयक लाभ मिळतात. उदाहरणार्थ, लोण्याऐवजी (संतृप्त मेद) सूर्यफुलाच्या तेलाचा (असंतृप्त मेद) वापर केल्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते; त्यामुळे हृदयविकास आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. याखेरीज, भारतातील बहुसंख्य खाद्य तेलांमध्ये व्हिटॅमिन ए आणि डी सह विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्सचा समावेश असतो, ज्यामुळे आपले एकूण आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते.

ट्रान्स-फॅटी अ‍ॅसिड्स (टीएफए) हे जागतिक स्तरावर हृदयविकार आणि पक्षाघातामागील प्रमुख कारण ठरणारे सर्वाधिक घातक प्रकारातील मेद आहेत. टीएफए हे सर्वसाधारणपणे दोन स्त्रोतांपासून प्राप्त होतात – अंशत: घनस्वरुपातील (हायड्रोजनेटेड) खाद्य तेल (औद्योगिक टीएफए) आणि प्राण्यांपासून. औद्योगिक आणि प्राण्यांपासून अशा दोन्ही स्त्रोतांपासून तयार झालेल्या टीएफएमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण बिघडते आणि हृदयविकाराची शक्यता बळावते, असे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.

वनस्पती तेलांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात, त्यामुळे वनस्पती तेलांपेक्षा खाद्य तेलं अधिक आरोग्यदायी आहेत. ट्रान्स-फॅटच्या हृदयावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांची दखल भारतात एफएसएसएआयने घेतली असून त्यांनी अलिकडेच जास्त प्रमाण असलेल्या ट्रान्स-फॅटचा समावेश असलेल्या खाद्यान्नांच्या दुष्परिणामांबाबत ग्राहकांना जागरुक करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर, सन २०२२ पर्यंत भारतीय खाद्य व्यवस्थेतून औद्योगिक पातळीवर तयार होणारे टीएफए हद्दपार करण्यासाठी त्यांनी सर्व संबंधित घटकांसमवेत काम करण्यास देखील सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जग टीएफए-मुक्त करण्यासाठी २०२३ हे लक्ष्य निर्धारित केले आहे. किंबहुना, जगभरात आज याच दिशेने विचार सुरू आहे.

जगभरात वनस्पतीजन्य आहार केवळ पोषक म्हणूनच नव्हे, तर आपल्या पृथ्वीसाठी उपकारक म्हणूनही स्वीकारला जात आहे. अमेरिका, नेदरलँड्स आणि नॉर्डिक देशांसह विविध देशांमधील आरोग्यक्षेत्रातले अधिकारी मांसाहारापेक्षा वनस्पतीजन्य आहाराची शिफारस करत आहेत. वनस्पतीजन्य आहारामुळे आपल्या अन्नाशी निगडित कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते, कारण अन्नाशी निगडित प्रदूषणाकारी वायू उत्सर्जनापैकी ५०% अधिक उत्सर्जन हे प्राण्यांशी निगडित उत्पादनांमुळे होते. आपल्या पृथ्वीच्या आरोग्याशी निगडित ही बाब असल्यामुळे वनस्पतीजन्य आहार हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहार आहे.

जागरूक ग्राहक या नात्याने आरोग्यदायी पर्यायाचा स्वीकार करणे सोपे आहे. घाईगडबडीत खरेदी करण्याच्या आपल्या नेहमीच्या सवयीतून थोडासा वेळ काढून आपण जी उत्पादने खरेदी करतो, त्यातील घटकांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमच्या हृदयासाठी आरोग्यदायी असलेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या. ट्रान्स-फॅट आणि अति संतृप्त मेदाचा समावेश असलेल्या उत्पादनांऐवजी चांगल्या मेदांचा समावेश असलेल्या खाद्यतेल आधारित अन्नाचे सेवन करा. शिफारसपात्र तेलाचा वापर (सोयाबीन, रॅपसीड, मोहरी, भुईमूग/शेंगदाणे, तांदळाचा कोंडा, ऑलिव्ह, खोबरे, मका, सॅफ्लॉवर, सूर्यफुलाचे तेल) करून बनवलेली कोशिंबिर, तेलाधारित कुकीज आणि बिस्किट्स, दुग्धेतर मेदाधारित आइसस्क्रीम/फ्रोझन डेझर्ट्स, चॉकलेट्स, आणि वनस्पती तेलाचा वापर न करता बनवलेले भाजलेले खाद्यपदार्थ व बेकरी उत्पादने यांची निवड करा. आहारात केलेल्या या सोप्या बदलांमुळे आपल्या केवळ आरोग्यावरच सकारात्मक परिणाम होतात, असं नाही तर आपल्या पर्यावरणावर येणारा ताणही कमी होण्यास मदत होते.

(लेखिका दिल्ली येथील अखिल भारतीा आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स)  आहारतज्ज्ञ आहेत.)