– डॉ. श्रीराज देशपांडे

कोविड-19 फैलावाचा मुकाबला करण्यासाठी लक्षावधी लोक सध्या घरात बंदिस्त आहेत. या अशा स्थितीत सकारात्मक राहण्यासाठी आणि प्राप्त स्थितीकडे रचनात्मक दृष्टीने पाहणे महत्त्वपूर्ण ठरते. जर तुम्ही सिंगल पालकत्व सांभाळणाऱ्या माता (सिंगल मॉम) आहात आणि शाळा दीर्घकाळासाठी बंद राहणार असल्याची बातमी तुमच्यापर्यंत एव्हाना पोहोचली असल्यास मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतीलच– घरातील सिंगल पालक हा बालकाची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो? सिंगल पालकत्व निभावणाऱ्या महिलांनी नोकरी आणि आर्थिक सुरक्षा कशी सांभाळावी? तर मग तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक आणि आरोग्यविषयक गरजांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा.

Prenatal diagnosis of well developed fetus in fetu
महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ!.. काय आहे ‘फिट्स इन फिटू’ हा दुर्मिळ प्रकार?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
private hospital news in marathi
राज्यभरातील खासगी रुग्णालयांची झडती… आरोग्य मंत्र्यांच्या सूचनेनंतर आता…
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
How to relieve discomfort in generation
अस्वस्थता रिचवायची आहे…

प्रत्येक महिलेची परिस्थिती निराळी असू शकते. आपल्या जोडीदारासोबत फारकत घेण्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतील. सिंगल पालकत्व म्हणजे मूल वाढविण्याची जबाबदारी तुमच्या एकटीची आहे, असे अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या आई-वडील-भावंडांकडून निरपेक्ष पाठबळ मिळू शकते. कुटुंबांची काळजी घेण्यासोबतच स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे देखील तितकेच आवश्यक ठरते. स्वत:ची मुलं आणि कुटुंबियांच्या वैद्यकीय आपतकालीन गरजांचा विचार सिंगल पालकत्व निभावणाऱ्या मातांसाठी जिकिरीचा होऊन बसतो. याविषयी स्वत: संशोधन करून तुमच्या गरजांनुरूप आरोग्य विमा खरेदी करणे हा एक सोपा तोडगा म्हणता येईल.

इथे दोन परिस्थितींचे उदाहरण घेऊन सिंगल पालकत्व सांभाळणाऱ्या महिलांसाठी विमा विषयक कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते पाहून गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करुया:

1. मूल/मुलं असणाऱ्या सिंगल पालकत्व सांभाळणाऱ्या माता:

आर्थिक स्वातंत्र्य हे सर्वात मोठे आव्हान आहे. एकटीने पोटा-पाण्याची जबाबदारी, मुलांचे संगोपन आणि घर सांभाळावे लागते. एक आई म्हणून बालकाला सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असते. जसे मूल मोठे होत जाते, तसे त्याच्या/तिच्या खोड्या करण्याचे प्रमाण वाढते. अनेकदा मूल पडते, धडपते, त्याला इजा होऊ शकते, ते जायबंदी होऊ शकते. हे प्रसंग नक्कीच चिंतेत टाकणारे आहेत, मात्र त्यातूनच मूल शिकत असते. त्याला भल्या-बुऱ्याची जाणीव होते. त्यामुळे तुमच्या बालकाची नियमित वाढ आणि सुरक्षा लक्षात घेऊन विमा खरेदी करण्याचा सल्ला देऊ इच्छितो. विमा कवच रुग्णालय भरती आणि निगडीत खर्चात पाठबळ देणारा ठरेल. अर्थात तुम्ही कोणता विमा पर्याय निवडता त्यावर ते अवलंबून आहे. आरोग्य विम्यासोबत बालकातील अवखळपणा कायम राहील याची खातरजमा तुम्हाला राहते. तुम्हाला आर्थिक चिंता करण्याची गरज उरत नाही.

2. सिंगल पालकत्व निभावणाऱ्या आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या माता:

आजच्या जागतिकीकरण आणि शहरीकरणाच्या ओघात अनेक महिलांना बालकाचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा आधार असतो. त्यामुळे आवश्यकता असल्यास या कुटुंबाला साह्य करण्याची जबाबदारी सिंगल मातांवर येऊ शकते. अलीकडे जीवनशैलीमुळे आजारांचा धोका बळावला आहे. त्यातच वैद्यकीय उपचारांचे खर्च अवाढव्य असतात. आपल्या जीवलगांच्या आरोग्य विषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी फॅमिली फ्लोटर ही एक सर्वोत्तम कौटुंबिक योजना ठरते. संपूर्ण कुटुंबाकरिता ही सिंगल पॉलिसी असल्याने ती प्रत्येक कुटुंब सदस्यासाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याच्या त्रासातून मुक्त करते.

वैद्यकीय लाभांशिवाय जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी मेडीकल इन्श्युरन्स प्रीमियम भरत असाल तर प्रत्येक आर्थिक वर्षात रु. 25000/- पर्यंतच्या अतिरिक्त वजावटीवर दावा करता येतो. जर आई-वडील किंवा दोघांपैकी कुणीही एक ज्येष्ठ नागरीक असल्यास ही मर्यादा रु. 30000/- पर्यंत असते.

सिंगल माता/ पालक म्हणून तुम्ही पद्धतशीर नियोजन केले पाहिजे. आरोग्य विमा तुम्हाला वैद्यकीय खर्चांपासून तर वाचवतोच, शिवाय कर बचतीमध्ये उपयुक्त ठरतो. सिंगल पालक म्हणून तुम्ही कष्टाने कमावलेल्या पैशाची बचत करून सर्व जबाबदाऱ्यांची पूर्तता करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मेडीकल कव्हर केवळ मन:शांती देत नाही, तर कर वजावटीपासून तुमच्या उत्पन्नाचे रक्षण करते.

तुम्ही आवश्यक ती माहिती घेऊन योग्य विमा आणि विमा पुरवठादाराची निवड केली पाहिजे. जेणेकरून तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित राखायला मदत मिळेल.

(लेखक चीफ ऑपरेटींग ऑफिसर, फ्युचर जनराली इंडिया इश्युरन्स कंपनी लिमिटेड आहेत)

Story img Loader