सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. गुलाबी थंडीची मजा घ्यायला जसे तरुण पिढीला आवडते तसेच घरातील लहान मुलांची, वृद्धांच्या शाररिक आरोग्याची काळजी करणे तितकेच महत्वाचे ठरते. या अनुशंगाने थंडीच्या दिवसात ‘फिट’ राहण्यासाठी गूळ आपल्याला मदत करणारा ठरतो
थंडीच्या दिवसात गूळ खाण्याचे फायदे-
थंडीच्या दिवसता थंडीपासून बचावासाठी आपल्या शरिराला गूळापासून ऊर्जा प्राप्त होते आणि आपण अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकतो. याकाळात गूळाचे नियमित सेवन केल्याने सर्दीने होणाऱया आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. गूळ शरिराला लवकर पचतो तसेच शरिरातील रक्ताचे प्रमाणही वाढवतो. थंडीच्या दिवसात कफचा त्रासही जास्त सतावतो. गूळ खाल्ल्याने कफ, अपचन यावर मात करता येते. आल्यासोबत थोडा गूळ खाल्ल्यामुळे कफ नष्ट होतो.

Story img Loader