शरीरासाठी विटामिन्स किती महत्वाचे असतात ते लहान असताना आपल्याला शाळेत शिकविले जाते. तसे तर प्रत्येक विटामिनचे आपले असे महत्व असते. परंतु, आज आपण या लेखाद्वारे विटामीन ‘बी’चे महत्व जाणून घेणार आहोत. विटामीन ‘बी’ आपल्यातील ऊर्जेची पातळी वाढविते. त्याचबरोबर बुद्धी तल्लख ठेवण्यास मदत करते. चला तर, जाणून घेऊया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्यात विटामिन ‘बी’ची भरपूर मात्रा आहे, ज्याचे सेवन आपण नेहमी केले पाहिजे.
१. आक्रोड
आक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि एंटीऑक्सिडेंट्सची भरपूर मात्रा असते. याशिवाय यात विटामिन बी-५, बी-१ (थियामिन) आणि विटामीन बी-६ सुध्दा असते. इतकेच नाही तर यात खूप कमी प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते. यातील पौष्टीक घटक मन प्रसन्न ठेवते, एनर्जी लेव्हल वाढवते आणि स्मरणशक्ती चांगली करण्यात मदत करते. त्याचबरोबर डोळे, दात, त्वचा आणि मेंदूसाठीसुद्धा चांगले असते.
२. काजू
काजूमुळे फॅट वाढेल असे मुलींना वाटत असल्या कारणाने त्या काजूला पसंती देत नाहीत. परंतु, असे काही नसून, काजूमध्ये विटामीन बी-३, बी-१ आणि बी-६ असते. ज्यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते. यात आयर्न, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि झिंक असते. याबरोबरच काजू एंटीऑक्सिडेंट आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. काजूमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. याच्या सेवनाने हृदयाच्या संबंधीच्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते.
३. पालक
कोणत्याही प्रकारच्या हिरव्या भाज्या शरीरासाठी चांगल्याच असतात. शरीरात ऊर्जेचे सातत्य टिकविण्यासाठी पालक या पालेभाजीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. यात विटामीन बी-२, बी-९, विटामीन सी, ए, आयर्न, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे संपूर्ण शरीराला आणि मनाला तंदुरूस्त बनवते. पालकाच्या सेवनाने पचन तंत्र निट होऊन, भूक वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग मिटतात आणि त्वचा स्वच्छ होते.
४. बदाम
जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट आठवत नाही, तेव्हा स्मरणशक्ती वाढविण्यासाठी रोज एक बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये विटामीन बी-२, बी-१, बी-५, बी-३, बी-९ आणि बी-६ परिपूर्ण असतात. याशिवाय यात विटामीन ई, मॅग्नेशियम, आयर्न आणि प्रोटीनसुद्धा असते. याला आपल्या दररोजच्या खाण्यापिण्यात सामील करणे गरजेचे आहे.
५. केळ
केळामध्ये विटामीन बी भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या सकाळच्या न्याहारीत केळाचे सेवन जरूर करा. यात विटामीन बी-५, बी-६ चा चांगला स्त्रोत असतो. याशिवाय यात विटामीन सी, फायबर, पोटॅशियम आणि ७४% पाणी असते. केळामुळे तणाव कमी होण्यासदेखील मदत होते. केळात ट्राइप्टोफान नामक एमिनो अॅसिड असते, जे मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. मुली तर केळाने त्यांचा चेहरासुद्धा साफ करतात, ज्यामुळे त्यांचा चेहरा उजळतो.