Indian Festival 2023 List: २०२३ हे वर्ष आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. येत्या नव्या सण उत्सवांच्या निमित्ताने काही मोठ्या सुट्ट्या मिळणार आहेत. तर काही सुट्ट्या नेमक्या रविवारच्या दिवशी आल्याने कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा कधी आहे? तसेच मागच्या वर्षी ज्या बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या असे सांगून अलविदा म्हंटले होते ते बाप्पा येत्या वर्षात कधी येणार? नवरात्रीच्या निमित्त रासगरबा कधी रंगणार? होळी कधी आणि दिवाळीची पहिली अंघोळ कधी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण एका सोप्या तक्त्यातून जाणून घेणार आहोत. २०२३ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यात कोणता सण कधी आहे हे जाणून घेऊयात..
जानेवारी २०२३ | फेब्रुवारी २०२३ | मार्च २०२३ |
१५ जानेवारी – मकरसंक्रांती २६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन | १८ फेब्रुवारी – महाशिवरात्री १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार) | ६ मार्च- होळी ७ मार्च- धूलिवंदन १० मार्च- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) २२ मार्च – गुढीपाडवा ३० मार्च- रामनवमी |
एप्रिल २०२३ | मे २०२३ | जून २०२३ |
४ एप्रिल- महावीर जयंती ६ एप्रिल- हनुमान जयंती ७ एप्रिल- गुड फ्रायडे ९ एप्रिल- ईस्टर १४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २२ एप्रिल- अक्षय्य तृतीया/ रमझान ईद | १ मे- महाराष्ट्र दिन ५ मे- बुद्ध पौर्णिमा | २९ जून- आषाढी एकादशी/ बकरी ईद |
जुलै २०२३ | ऑगस्ट २०२३ | सप्टेंबर २०२३ |
३ जुलै- गुरुपौर्णिमा २९ जुलै- मोहरम | १५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन १६ ऑगस्ट- पारशी नववर्ष २१ ऑगस्ट- नागपंचमी ३० ऑगस्ट- नारळी पौर्णिमा/ रक्षाबंधन | ६ सप्टेंबर- गोकुळाष्टमी ७ सप्टेंबर- दहीहंडी १८ सप्टेंबर- हरतालिका १९ सप्टेंबर- गणेश चतुर्थी २० सप्टेंबर- ऋषी पंचमी २८ सप्टेंबर- अनंत चतुर्दशी/ ईद- ए- मिलाद |
ऑक्टोबर २०२३ | नोव्हेंबर २०२३ | डिसेंबर २०२३ |
२ ऑक्टोबर- गांधी जयंती १५ ऑक्टोबर- घटस्थापना २४ ऑक्टोबर- दसरा २८ ऑक्टोबर- कोजागिरी पौर्णिमा | १० नोव्हेंबर- धनत्रयोदशी १२ नोव्हेंबर- लक्ष्मी पूजन १४ नोव्हेंबर- दिवाळी पाडवा १५ नोव्हेंबर- भाऊबीज २७ नोव्हेंबर- गुरुनानक जयंती | २५ डिसेंबर- नाताळ/ दत्त जयंती |
हे ही वाचा<< २०२३ मध्ये ‘हे’ २४ दिवस बँक असणार बंद! महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्ट्यांचं पत्रक केलं जारी, पाहा
२०२३ च्या नववर्षातील सुट्ट्यांचे हे पत्रक आजच सेव्ह करून ठेवा. तुम्हाला सुट्ट्या बघून फिरायला जाण्याचे प्लॅन करायचे असल्यास त्यासाठीही हे पत्रक नक्की कामी येईल.२०२३ च्या नववर्षातील सुट्ट्यांचे हे पत्रक आजच सेव्ह करून ठेवा. तुम्हाला सुट्ट्या बघून फिरायला जाण्याचे प्लॅन करायचे असल्यास त्यासाठीही हे पत्रक नक्की कामी येईल.