वांगी, कारली, गवार, भोपळा या भाज्यांप्रमाणेच अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. पडवळ हे नाव जरी काढलं तरी अनेक जण तोंड वेडवाकडं करतात. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात पडवळ खाण्याचे फायदे.

पडवळाचे फायदे –

१. छातीत दुखत असेल किंवा धडधड होत असेल तर अशा आजारांवर पडवळ ही अत्यंत गुणकारी भाजी आहे.

२. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे, किंवा ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत अशांनी नियमितपणे आहारात पडवळाचा समावेश केला पाहिजे. पडवळ खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

३. सध्याच्या काळात अनेक जण मधुमेह, हृदयरोग या सारख्या आजाराने त्रस्त आहेत. अशा आजारांवर पडवळ गुणकारी आहे.

४. पडवळामुळे रक्तपुरवठाही सुरळीत होतो

५. पडवळ कृमीनाशक असल्यामुळे कृमीच्या तक्रारी असल्यास पडवळाचा आहारात समावेश करावा.

६. त्वचेच्या विकारांवरही पडवळ फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसात अनेक त्वचारोग बळावतात अशावेळी आहारात पडवळाचा आर्वजून सहभाग करावा.