आजकालच्या काळामध्ये प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे आणि दगदगीचा झाले आहे. ऑफिस,घर आणि अन्य कामांमुळे आपल्या जेवणाच्या वेळा देखील नियमित नसतात. धावपळीच्या जीवनामध्ये देखील शारीरिक तंदुरुस्तीसाठी अनेक जण नियमित व्यायाम करतात. जास्तीत जास्त कॅलरी बर्न करण्यासाठी तुम्ही तुमची सर्व शक्ती खर्च करत असता. आज आपण वर्कआऊट सेशनच्या आधी आणि नंतर स्ट्रेचिंग केल्यानंतर काय फायदे होतात ते आज आपण पाहणार आहोत.
अनेकदा स्ट्रेचिंग हे वर्कआऊट करताना एवढे महत्वाचे वाटत नाही किंवा त्याकडे लक्ष दिले जात नाही. मात्र स्ट्रेचिंगचे अनेक फायदे आहेत तसेच केल्यामुळे तुमच्या स्नायूंना दुखण्यापासून वाचवण्यासाठी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. वर्कआऊट करण्याच्या आधी व नंतर स्ट्रेचिंग केल्यास शरीराला चांगचा फायदा होऊ शकतो. याबाबतचे वृत्त timesnownews ने दिले आहे.
हेही वाचा : तुम्हीही रात्री झोपताना वारंवार कूस बदलता का? ‘या’ तीन योगासनांमुळे येऊ शकते शांत झोप
रक्त प्रवाह वाढतो : तुम्ही व्यायाम करत असताना जड वजने उचलण्यास सुरूवात करण्यापूर्वी किंवा कार्डिओ रुटीनमध्ये सामील होण्याआधी स्ट्रेचिंग करणे महत्वाचे आहे. स्ट्रेचिंग हे तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढवण्यासाठी मदत करते.
लवचिकता वाढते : वर्कआऊट आधी आणि नंतर स्ट्रेचिंग केल्यानंतर फक्त रक्तप्रवाह वाढतो असे नाही तर ते तुमच्या वर्कआउट दरम्यान शरीर लवचिक होण्यासाठी मदत करते. व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग हा स्नायू सैल करण्याचा एक चांगला मार्ग आहे ज्यामुळे शरीराच्या हालचालींची गती वाढते.
कार्यक्षमता सुधारते: तुम्ही वर्कआऊट दरम्यान स्वतःला स्ट्रेच केले असेल तर तुमचा रक्तप्रवाह आणि शरीराच्या हालचालींच्या गतीमध्ये वाढ होते. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेमध्ये नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात.
हेही वाचा : Shampoo: शॅम्पूचे १०० पाऊच घेणं फायदेशीर की १०० रुपयांची एक बॉटल घेणं? काय जास्त योग्य?
दुखापत होण्याचा धोका कमी होतो: व्यायाम झाल्यानंतर तसेच जड वजन उचलल्यामुळे स्नायू घट्ट होतात. त्यांना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दुखापत होऊ नये म्हणून वर्कआऊट नंतर देखील स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे.
आराम मिळतो: व्यायामाआधी आणि व्यायामानंतर स्ट्रेचिंग करणे आवश्यक असते. व्यायामाआधी स्ट्रेचिंग केल्यामुळे स्नायू सैल होण्यास मदत होते. तसेच व्यायाम झाल्यावर जड वजन उचलले असल्याने स्नायू जाड होतात किंवा घट्ट होतात ते सैल होण्यासाठी देखील स्ट्रेचिंग करणे आवश्यक असते. स्ट्रेचिंगमुळे तुमच्या शरीराला होणार त्रास कमी होतो.
लॅक्टिक अॅसिडपासून सुटका होते : लॅक्टिक अॅसिड हे असे अॅसिड आहे जे वर्कआऊट दरम्यान शरीरात तयार होते. यामुळे स्नायू दुखण्याची शक्यता असते व चिडचिड देखील होऊ शकते. मात्र जर का तुम्ही काही वेळ स्ट्रेचिंग केले तर तुमची लॅक्टिक अॅसिडपासून सुटका होण्यास मदत होते.