Swine Flu: करोनाची दहशत अजून संपलेली नाही तोच, स्वाइन फ्लूने लोकांची चिंता वाढवली आहे. देशात अनेक ठिकाणी स्वाइन फ्लू हाहाकार माजवताना दिसत आहे. केरळ, यूपी आणि राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूने आता सर्वसामान्यांमध्ये खळबळ उडाली आहे. केरळमध्ये स्वाइन फ्लूमुळे एका मुलीचा मृत्यू झाला आहे, तर राजस्थानमध्ये गेल्या दोन महिन्यांत ९० हून अधिक रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका सराफा व्यापाऱ्याचाही स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. आता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये स्वाइन फ्लूचे तीन आणि ओडिशात दोन रुग्ण आढळून आले आहेत. देशात सातत्याने वाढत असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांमुळे आता लोकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे या आजारावर वेळीच उपचार करणे अत्यावश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया या आजाराशी संबंधित कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध याबद्दलची माहिती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वाइन फ्लू म्हणजे काय?

स्वाइन फ्लू हा डुकरांद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. स्वाइन फ्लू इन्फ्लुएंझा A ला H1N1 व्हायरस असेही म्हणतात. हा रोग संक्रमित मानव किंवा प्राण्यांद्वारे पसरतो. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या शिंकताना आणि खोकताना सोडलेल्या थेंबांद्वारे तसेच संक्रमित पृष्ठभागाच्या संपर्काद्वारे पसरतो. त्याची लक्षणे इन्फ्लूएंझा सारखीच असतात. हा विषाणू तुमच्या नाक, घसा आणि फुफ्फुसांच्या रेषेत असलेल्या पेशींना संक्रमित करतो. या संसर्गाची लक्षणे सौम्य आणि गंभीर दोन्ही असू शकतात. साधारणपणे उन्हाळा आणि पावसाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होते.

(हे ही वाचा: व्हायरल ताप असल्यास लगेच औषधे खाऊ नका; जाणून घ्या लवकर बरं होण्यासाठी सर्वात सोपा उपाय)

स्वाईन फ्लूचा इतिहास काय आहे?

सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, १९१८ मध्ये हा विषाणू आढळल्याची पुष्टी झाली. त्यानंतर डब्ल्यूएचओने २००८ मध्ये याला महामारी म्हणून घोषित केले. त्यावेळी या आजाराची पहिली केस मेक्सिकोमध्ये नोंदवली गेली होती. लवकरच हा आजार जगभर पसरला. २०२२ च्या आधी, २००९ ते २०१५ मध्ये भारतातही त्याची प्रकरणे समोर आली आहेत.

‘या’ लक्षणांवरून स्वाइन फ्लू ओळखा

सामान्य लक्षणांमध्ये थंडी वाजून येणे, ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, अतिसार, मळमळ किंवा उलट्या, नाक वाहणे इ. गंभीर असल्यास, श्वास घेण्यास त्रास होणे, न्यूमोनिया, ऑक्सिजनची कमतरता, छातीत दुखणे, सतत चक्कर येणे, अत्यंत अशक्तपणा आणि स्नायू दुखणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

( हे ही वाचा: Mansoon Tips: पावसाळ्यात ‘हे’ घरगुती उपाय सर्दी आणि ताप कमी करतील; रोगप्रतिकारक शक्ती देखील होईल मजबूत)

उपचार आणि प्रतिबंध याबद्दल जाणून घ्या

  • स्वाइन फ्लू दरम्यान , अँटीव्हायरल औषधांव्यतिरिक्त, संसर्गाची लक्षणे कमी करणारी औषधे आवश्यक असतात. याशिवाय रुग्णाला विश्रांती घेण्याचा आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
  • हे टाळण्यासाठी , सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना फ्लू लसीकरण करण्याचा सल्ला दिला जातो.
  • सर्जिकल मास्क लावणे, एखाद्या गोष्टीला स्पर्श केल्यानंतर वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेची काळजी घेतल्याने हे टाळता येऊ शकते.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the midst of corona now swine flu has increased peoples concern know its symptoms treatment and prevention methods gps