शनि नंतर राहू हा संथ गोचर करणारा ग्रह मानला जातो. राहूच्या प्रभावाची तुलना शनीच्या प्रभावाशी केली जाते. या ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे १.५ वर्षे लागतात. राहु १२ एप्रिल रोजी वृषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा काही राशींवर शुभ प्रभाव तर काहींवर अशुभ राहील. येथे तुम्हाला कळेल की राहुचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ज्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.

वृषभ

या राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण चांगले राहील. या काळात काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरी करणाऱ्यांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. हे संक्रमण व्यावसायिकांसाठीही शुभ ठरेल.

मिथुन

या राशीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे नोकरदार आहेत, त्यांचा पगार वाढू शकतो. या वर्षी चांगले उत्पन्न मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. विशेषत: व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. या संक्रमणादरम्यान चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठीही चांगला काळ आहे.

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या लोकांना वाटते लग्नाची भीती, जीवनसाथी शोधण्यासाठी लागतो जास्त वेळ )

कर्क

या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण देखील शुभ दिसत आहे. नवीन मित्र बनतील. ज्यांच्याकडून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा अपेक्षित आहे. तुमच्या आवडीचे काम केल्याने तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल.

( हे ही वाचा: ‘या’ आर्थिक योजना महागाईतही देतात मोफत विमा,जाणून घ्या अर्ज कसा करावा )

तूळ

या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभ राहील. या कालावधीत तुम्हाला अनधिकृत स्त्रोतांकडून कोणत्याही प्रकारचा नफा मिळू शकतो. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही चांगली योजना बनवू शकाल. प्रवासातून धनाची अपेक्षा राहील. पदावर पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

Story img Loader