रक्तदाब वाढणे आणि कमी होणे या दोन्हीही गोष्टी आरोग्यासाठी घातक आहेत. अयोग्य जीवनशैली आणि आहारामुळे विकसित होणाऱ्या या आजाराच्या दोन्ही परिस्थिती वाईट आहेत. शरीरासाठी उच्च रक्तदाब जितका धोकादायक आहे तितकाच कमी रक्तदाब देखील अपायकारक आहे. कमी रक्तदाब ही एक समस्या आहे जी भूक, तणाव आणि हवामानामुळे उद्भवू शकते. कमी रक्तदाबामुळे थकवा, अशक्तपणा, मूर्च्छा, उलट्या आणि चक्कर येऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमी रक्तदाब म्हणजे काय?

रक्तदाब १२०/८० (सिस्टोलिक/डायस्टोलिक) हा सामान्य रक्तदाब असतो परंतु जेव्हा रक्तदाब त्याच्या खाली येऊ लागतो तेव्हा त्याला लो बीपी म्हणतात. कमी रक्तदाबामुळे हृदय, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पोहोचू शकत नाही. कमी रक्तदाबाची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत, परंतु चक्कर येणे आणि बेशुद्ध होणे ही दोन्ही कमी रक्तदाबाची मुख्य आणि सामान्य लक्षणे आहेत.

वर्कआउट करण्यापूर्वी आणि नंतर कसे आणि किती प्रमाणात पाणी प्यावे; जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

कमी रक्तदाबाची कारणे:

कमी रक्तदाब हा एक आजार आहे जो स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. मज्जासंस्था कमकुवत होणे, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, हिमोग्लोबिनची कमतरता यामुळे रक्तदाब कमी होण्याची समस्या उद्भवते. ज्यांचे मन कमकुवत आहे त्यांनाही कमी रक्तदाबाची समस्या असते. तुमचे बीपी कमी असताना तुम्हालाही चक्कर येते. आज आपण जाणून घेऊया घरच्या घरी आपण कमी रक्तदाबावर कशाप्रकारे उपचार करू शकतो.

बिअरच्या बॉटल्स फक्त हिरव्या आणि तपकिरी रंगाच्याच का असतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण

  • ज्या लोकांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी पाण्यात साखर आणि थोडे मीठ घालून प्यावे, रक्तदाब सामान्य राहील.
  • कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी योग करावा. यामध्ये सूर्यनमस्कार, कपालभाती आणि अनुलोम विलोम यासारखे व्यायाम करा. असे केल्याने तुम्हाला लो बीपीपासून मुक्ती मिळेल.
  • मज्जासंस्था ठीक करण्यासाठी दररोज दोन मिनिटे टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याने एक्वाप्रेशर पॉइंट्स दाबले जातात, यामुळे रक्तदाब सामान्य होतो. एक ते दोन मिनिटे टाळ्या वाजवल्याने मज्जासंस्था सुरळीत राहते.
  • कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रक्तदाब सामान्य करण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करावे. ज्यांना साखरेची समस्या आहे त्यांनी अश्वगंधाचे सेवन करू नये. अश्वगंधा चवीला गोड असते ज्यामुळे साखर वाढते.
  • ज्यांना रक्तदाब कमी आहे, त्यांनी आहारात खजूर, केळी, मनुका, गाजर, सफरचंद, पालक, बथुआ आणि अंजीर यांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब सामान्य राहील.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incase of sudden drop in blood pressure do this remedies at home pvp