Black Rice Benefits: सर्वसाधारणपणे सर्वांकडे पांढरा तांदूळ खाल्ला जातो. भात खात असताना आपण कधी विचार केला आहे का, भात आरोग्यासाठीही किती फायदेशीर असतो. काहीजण तपकिरी तांदूळही खातात. तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदुळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. महत्त्वाचे म्हणजे, पांढर्या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळा तांदूळ आरोग्यासाठी कितीतरी पटीने जास्त फायदेशीर आहे. काळ्या तांदळात भरपूर प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट असतात त्यामुळे आरोग्यासाठी त्याचे एक नाही तर अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया.
काळ्या तांदळामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँथोसायनिनचे प्रमाण भरपूर
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काळा तांदूळ पांढर्या तांदळापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. काळ्या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक स्वच्छ करतात. याशिवाय काळा तांदूळ बर्याच रोगांमध्येही फायदेशीर ठरतो. याशिवाय, त्याच्यामध्ये अँन्थोसायनिन देखील आहे, जे हृदयाशी संबंधित असलेल्या अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. एवढेच नव्हे तर ते आपल्याला हार्ट अटॅकपासून देखील वाचवते.
(हे ही वाचा : पांढरा किंवा तपकिरी? कोणत्या रंगाचे अंडे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर; वाचा तज्ज्ञांचा सल्ला )
काळ्या तांदळाचे आरोग्यासाठी फायदे
- हृदय
हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.
- अशक्तपणा आणि अल्झायमरची समस्या
काळ्या तांदळाच्या सेवनाने अशक्तपणा आणि थकवा येण्याची समस्या दूर होते. यासोबतच अल्झायमरची समस्याही याच्या सेवनाने हळूहळू कमी होऊ लागते. मधुमेहाचा त्रास असेल तर बाकीचे भात खाणे टाळले जाते, पण मधुमेह असला तरीही हा भात तुम्ही खाऊ शकता.
- शरीर डिटॉक्स
काळ्या तांदळाच्या सेवनाने बॉडी डिटॉक्स होते. वास्तविक हा तांदूळ अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. हे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर होतात आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.
(हे ही वाचा: Weight loss Diet: वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ; रक्तातील साखरही नियंत्रणात येण्यास होईल मदत)
- ब्रेस्ट कॅन्सर
काळ्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येतं. त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून सुटका होते. त्याचबरोबर शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर करून ब्रेस्ट कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव होतो.
- वजन नियंत्रणात
काळा तांदळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.