पावसाळा हा ऋतू अनेकांना आवडतो. या दिवसांमध्ये सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. या दिवसांमध्ये मात्र पचनक्रिया मंद झालेली असते. तसेच पावसाळयात दूषित पाणी व अन्नामुळे विविध आजार होण्याची शक्यता वाढते .यामुळे या दिवसात चांगला आहार घेणे फार गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात काही विशेष फळं बाजारात येत असतात. ही फळे फक्त पावसाळ्यापुरती मर्यादित असतात. म्हणून यांचा आस्वाद नक्की घेतला पाहिजे. पावसाळ्यात खाण्यावर विशेष लक्ष दिले तर कोणतेही गंभीर आजार होणार नाही. चला तर जाणून घेऊयात पावसाळ्याच्या दिवसात कोणत्या फळांचे सेवन केले पाहिजे आणि त्या फळांचे फायदे

डाळिंब

डाळिंब हे फळ बाजारात बाराही महिने उपलब्ध असते. डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र पावसाळ्यात या फळाचे महत्त्व अधिक वाढत असते. आजारापासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज डाळिंब खाल्ले पाहिजे. फायबर आणि व्हिटामिनने युक्त असलेल्या डाळिंबाचे सेवन तसे वर्षभर करता येते. मात्र पावसाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित तक्रारी दूर होण्यास मदत होत असतात.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

नासपती

फायबरयुक्त असलेले नासपती हे फळ खूपच गोड आणि मधुर असे फळ आहे. याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले होते. यात अँटी ऑक्सीडेंट्स मात्रा जास्त असते. तसेच वजन कमी करण्यासाठीही याचा वापर केला जातो. नासपतीने कर्करोग, हायपरटेंशन, डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

आलूबुखार

पावसाळ्यात अनेकांना पोटाशी संबंधित आजार होत असतात. सतत बाहेरचे खाल्याने ही समस्या उद्भवत असते. आलूबुखार खाल्ल्याने इंफेक्शन आणि पोटाशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. रोज आलूबुखार खाल्ल्याने इम्यून सिस्टम मजबूत होते. यातील अँटीऑक्सीडेंटमुळे आजारांचा धोका कमी होतो.

लिची

लिची हे फळ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून खायला हवे. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्सचा पुरेपूर साठा असतो. हे फळ तुमची त्वचा सुधारण्यासोबतच रक्त वाढण्यासाठी मदत करते.

चेरी

चेरी या फळाचे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सेवन करणे चांगले समजले जाते. व्हिटॅमिन ए, बी, सी, बीटा कैरोटीन, कॅल्शिअम, आयर्न आणि पोटॅशिअम युक्त असे हे फळ आहे. यात खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. व्हिटामिन सी चे प्रमाण चेरीमध्ये अधिक असल्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने इंफेक्शनपासून बचाव होतो.

पीच

पीच हे फळ व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सनी पीच हे भरलेले असते. या फळाची चव निम गोड असते. या फळांचे अनेक फायदे आहेत. हृदयविकार नियंत्रणात ठेवणे, पचनशक्ती वाढवणे, ॲलर्जी कमी करणे आणि त्वचा सुधरवण्याचे काम पीच करते. पावसाळाच्या दिवसांमध्ये याची मागणी चांगलीच वाढत असते.