लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योग्य आणि पुरेसा आहार घेणे गरजेचे असते. यामुळे पालकांना नेहमी त्यांच्या मुलांच्या जेवणाची काळजी सतावत असते. कोणताही पौष्टिक पदार्थ दिला तर लहान मुलं लगेच टाळाटाळ करतात किंवा भूक नाही असं जाहीर करतात. पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी वाटत असल्याने त्यांचे प्रयत्न काही थांबत नाहीत. मग धाक दाखवून, वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून मुलांना पौष्टिक अन्नपदार्थ खाऊ घातले जातात. मुलांसाठी पालकांना अशी बऱ्याच बाबतीत मेहनत घ्यावी लागते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलांना काय काय खायला द्यायचे याची यादीचं काही जण तयार करतात. दिवसभर मुलांमध्ये एनर्जी राहावी यासाठी सकाळचा नाश्ता खूप महत्वाची भूमिका बजावतो. आरोग्याच्या दृष्टीने मुलांच्या नाश्त्यामध्ये कोणकोणत्या अन्नपदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – रात्रीच्या जेवणात ‘या’ पदार्थांचा समावेश चुकूनही करू नका; ठरतील आरोग्यास धोकादायक

मुलांच्या नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश करा

रव्याचा उपमा
रव्याचा उपमा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, तसेच त्यातून अनेक पोषकतत्वे मिळतात. त्यामुळे मुलांना नाश्त्यामध्ये तुम्ही रव्याचा उपमा देऊ शकता.

दलिया
दलियामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर आढळते. जे खाल्याने मुलं अनेक आजरांपासून लांब राहू शकतील. दलिया मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाश्ता ठरू शकतो.

पोहे
लहान मुलांना पोहे खूप आवडतात. पोहे मुलांच्या शारीरिक विकासासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही पोह्याचा समावेश मुलांच्या नाश्त्यामध्ये करू शकता.

पनीर
पनीरमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम दोन्ही मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे पनीर खाल्ल्याने मुलांचे दात आणि हाडं मजबुत होण्यास मदत होईल.

अंडी
मुलांच्या नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश देखील करू शकता. शिजवलेले किंवा एखाद्या वेगळ्या रेसेपीमधुन मुलांना अंडी देऊ शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)