Healthy Lifestyle : दररोजच्या धावपळीमुळे आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. पण काही लोक वेळ काढून घरी व्यायाम करतात, सकाळी फिरायला जातात म्हणजे मॉर्निंग वॉक करतात. तुम्ही सुद्धा मॉर्निंग वॉकला जाता का? जर हो तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. आज आम्ही अशा तीन चालण्याच्या प्रकाराविषयी जाणून घेणार आहोत, जे मॉर्निंग वॉकमध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता.

योग अभ्यासक मृणालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्यांनी चालण्याचे तीन प्रकार तुमच्या मॉर्निंग वॉकमध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी चालण्याच्या या तीन प्रकाराचे फायदे सुद्धा सांगितले आहेत.

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

१. ताडासनमध्ये चालणे

शरीराचे पोश्चर सुधारते श्वसनसंस्था मजबूत बनते.

२.मलासनमध्ये चालणे

पेल्विक फ्लोर, पायाचे स्नायू मजबूत होतात, पचनसंस्थेचे कार्य सुधारते.

३. उलटे चालणे

शरीराचा तोल सुधारण्यास मदत होते. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते.

हेही वाचा : Video: गव्हाच्या पीठामध्ये ‘हे’ पदार्थ टाकून पाहा काय होते कमाल, भन्नाट Kitchen Jugaad एकदा वापरून तर बघा

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सरळ चालण्यासोबतच अजून त्यात व्हेरिएशन समाविष्ट केल्यास आपल्या शरीराला अधिक फायदे मिळतात.गुडघेदुखी असल्यास मलासन, ताडासन मध्ये चालणे टाळा.
उलटे चालताना खड्डे, माणसे, प्राणी किंवा इतर वस्तू, वाहने मागे नाहीत याची काळजी घ्या.ज्यांना शरीर असंतुलनाची समस्या, पडण्याची अतीव भीती, चक्कर / व्हर्टिगोचा त्रास आहे त्यांनी मदतीशिवाय उलट चालण्याचा प्रयत्न करू नये.”

हेही वाचा : तुम्हाला जीवनसत्वे बी समृद्ध आहाराची गरज का आहे? कोणत्या पदार्थांमधून मिळते B12 आणि B3? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती मिळाली धन्यवाद” तर एका युजरने लिहिलेय, “यातला २ नंबरचा व्यायाम तर अवश्य करावा. कंबर व मनक्याचे स्नायू मोकळे होतात.” आणखी एका युजरने विचारलेय, “पोट कमी करताना.. धावणे व्यतिरिक्त अजुन काही मैदानावर व्यायाम करू शकतो का?” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला आहे.

मृणालिनी या एक योग अभ्यासक आहेत आणि त्या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवनवीन योगांविषयी माहिती सांगतात. एवढचं काय तर काही योगा प्रत्यक्षात करून सुद्धा दाखवतात.