जीवन इतकं गतिमान झालंय की, माणसाला विचारही करायला आता वेळ नाही. परिणामी, मानवी जीवनशैली विस्कळली. जेवायलाही वेळ नाही. आपण घराबाहेर पडलो की, काय खावं? काय खाऊ नये ? हा प्रश्न आपल्याला पडतो. अशातच पौष्टिक आहार म्हणून ‘ब्रेड’ युक्त पदार्थांना आपण पसंती देतो. खरतंर आपण नेमकं इथंच फसतो. निरोगी राहण्याच्या नादात रोगांना आमंत्रण देतो. म्हणून कुठली ब्रेड चांगली ? किती पोषक? कुठल्या प्रकारची ब्रेड आपलं वजन संतुलीत करेल ? हे आज आपण समजून घेऊया…
पोषक ब्रेडचे प्रकार
होल ग्रेन ब्रेड,अंकुरित ब्रेड, होल व्हीट ब्रेड किंवा ब्राउन ब्रेड, ओटमील ब्रेड या प्रकारातील ब्रेड अतिशय पौष्टिक आणि शरिरासाठी पोषक असतात. यात असे घटक असतात की, जे आपले वजन वाढू देत नाहीत. मात्र, आपली भूक नक्की भागवतात. त्याचबरोबर पोटाला कुठलाही प्रकारचा त्रास होऊ देत नाहीत. चला तर विस्ताराने समजून घेऊया या पोषक ब्रेड विषयी.
आणखी वाचा : व्हा सावधान ! रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांना ‘या’ गंभीर आजाराचा धोका
१. होल ग्रेन ब्रेड : हा ब्रेड शरिरासाठी पोषक आहे. संपूर्णपणे धान्यापासून हा ब्रेड बनविला जातो. ही ब्रेड ओट्स, बार्ली, कॉर्न आणि इतर धान्यांसारख्या विविध तृणधान्यांना पोषक तत्त्वे प्रदान करते. हा ब्रेड आहारात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि आतडे निरोगी राहतात.
२. स्प्राउटेड ब्रेड : कोणतेही धान्य अंकुरित केल्याने त्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि ते निरोगी बनते. अशी धान्ये खाल्ल्याने शरीराला अधिक पोषक द्रव्ये मिळतात. अशा प्रकारे, संपूर्ण धान्य ब्रेड जलद वजन कमी करण्यास मदत करतात आणि जुनाट आजारांचा धोका देखील कमी करू शकतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
३. होल व्हीट ब्रेड किंवा ब्राउन ब्रेड : हा ब्रेड नेहमीच्या ब्रेडपेक्षा खूप आरोग्यदायी असतो. सामान्य ब्रेडमध्ये पोषक तत्वेही कमी असतात आणि त्यामुळे आपले वजन वाढते. पण गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या ब्रेडमध्ये विविध पोषक घटक असतात आणि त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासही मदत होते. वजन कमी करण्याव्यतिरिक्त, या प्रकारची ब्रेड हृदयासाठी आरोग्यदायी मानली जाते. यामुळं टाइप -२ मधुमेहाचा धोका उद्भवत नाही.
आणखी वाचा : ओठांमुळं तुमचाही आत्मविश्वास कमी होतोय? ‘हे’ कराच! तुम्हीही दिसाल सुदंर आणि आकर्षक
४. ओटमील ब्रेड : हा ब्रेड शरिरासाठी पोषक आहे. यामध्ये वजन कमी करण्यात बार्लीची विशेष भूमिका असते. ओटमील ब्रेडमध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी १,लोह आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते, उच्च रक्तदाब कमी करते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात ठेवते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ओट ब्रेडचा समावेश करू शकता. याप्रकारची ब्रेड आपल्या आहारात आपण निवडली तर तुम्ही निरोगी राहू शकता.
तुम्हीही दिसाल स्लिम
स्लिम दिसायला कोणाला आवडत नाही? अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आणि पातळ होण्यासाठी लोकांच्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे डाएटिंग. मात्र, तुम्हाला डाएटिंग करण्याची गरज नाही. तुमच्या आहारात या वरिल पौष्टिक आणि पोषक ब्रेडचा समावेश कराल तर तुम्हीही दिसाल स्लिम आणि निरोगी.