Income Tax Return Last Date: प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २६ जुलैपर्यंत ३.४ कोटी लोकांनी आयकर रिटर्न भरले आहेत. विभागाच्या वतीने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ निश्चित करण्यात आली आहे. १५ जून २०२२ पासून सुरू झालेली आयटीआर दाखल करण्याची प्रक्रिया आणखी दोन दिवस म्हणजेच ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जवळ आली असली तरीही अद्याप बऱ्याच लोकांनी आपले आयटीआर भरलेले नाही. अशावेळी दंड भरावा लागणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण त्याचे उत्तर नाही असे आहे. आयकराच्या नियमानुसार, तुम्ही ३१ जुलैनंतर आयटीआर भरला तरीही तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. हा नियम काय आहे ते जाणून घेऊया.
आयटीआर फाइल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांनी सांगितले की ई-फायलिंगशी संबंधित वेबसाइट मंदावली आहे. दुसरीकडे आयकर विभाग आयकर भरणाऱ्यांना जागरूक करत आहे. कोणत्याही प्रकारचा दंड टाळण्यासाठी वेळेवर आयटीआर दाखल करा, असे विभागाकडून सांगण्यात आले. परंतु काही प्रकरणांमध्ये अंतिम तारखेनंतरही दंड न भरता आयटीआर दाखल केला जाऊ शकतो.
Photos : आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या अधिक तपशील
आयकर तज्ञांचे म्हणणे आहे की आयकराच्या कलम २३४एफ अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीचे आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर आयटीआर उशीरा भरण्यास काहीही हरकत नाही. सोप्या भाषेत, आर्थिक वर्ष २०२१-२२ पर्यंत तुमचे एकूण उत्पन्न २.५ लाख रुपये किंवा त्याहून कमी असल्यास, तुम्हाला ३१ जुलैनंतर आयकर भरल्यास कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुमच्या वतीने दाखल करण्यात येणार्या आयटीआरला शून्य आयटीआर म्हटले जाईल.
पाहा व्हिडीओ –
त्याचप्रमाणे, जर एखाद्याने जुन्या कर प्रणालीची निवड केली, तर ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना ही सूट २.५ लाख रुपये आहे. त्याच वेळी, ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आणि ८० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. त्याचप्रमाणे, ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मूळ सूट मर्यादा पाच लाख आहे.