best indoor plants for living room: सध्या प्रदूषणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. वाहने आणि कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे शहरांची हवा हिवाळ्यात विषारी बनते. वातावरणात असलेली ही हवा आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. अशा परिस्थितीत, हवा शुद्ध करण्यासाठी आणि ऑक्सिजन देखील पुरवण्यासाठी अशी काही झाडे आहेत जी तुम्ही घरामध्ये लाऊ शकतात.

स्नेक प्लांट, एरिका पाम, स्पायडर प्लांट इत्यादी झाडे घरात ऑक्सिजनचा पुरवठा करतात. ही झाडे हवेतील हानिकारक वायू आणि धुळीचे कण शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. ही रोपे घरी ठेवून आपण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
kala lake, Kalyan, Indurani Jakhad, contractor Notice,
कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई

स्पायडर प्लांट

स्पायडर प्लांट ही एक वनस्पती आहे जी हवा स्वच्छ करण्यास मदत करते. त्याच्या पानांमध्ये विशेष प्रकारचे तंतू असतात, जे हवेतील विषारी कण आणि घाण सहजपणे आकर्षित करतात. स्पायडर प्लांट विषारी वायू शोषण्यास मदत करते. म्हणूनच हवा शुद्ध करण्यासाठी ही सर्वोत्तम वनस्पती मानली जाते. तुम्ही ते तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये कुठेही ठेऊ शकता.

लेडी पाम

लेडी पामच्या पानांमध्ये काही विशेष गुणधर्म असतात, जे हवेतील प्रदूषित कणांना आकर्षित करतात आणि ते शोषून घेतात. लेडी पाम पान हवेतील विषारी वायू, बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी देखील शोषून घेतात. अशा प्रकारे ही वनस्पती हवा शुद्ध करण्यास मदत करतात. लेडी पाम प्लांट घरात लावल्याने हवेची गुणवत्ता सुधारते.

एरिका पाम

एरिका पाम म्हणजेच बांबूची झाडे, हे हवा स्वच्छ करण्यात खूप मदत करतात. बांबूच्या पानांमध्ये क्लोरोफिल आणि अँटिऑक्सिडंट नावाची रसायने असतात, जे हवेतील हानिकारक कण आणि वायूंना शोषून घेतात. त्यामुळे बांबूची रोपे लावून आपण आपल्या घरातील हवा स्वच्छ आणि शुद्ध ठेवू शकतो.

स्नेक प्लांट

स्नेक प्लांटच्या पानांवर अँटी-बॅक्टेरियल लेप असतो ज्यामुळे हवेतील दूषित बॅक्टेरिया नष्ट होतात. रात्रीच्या वेळीही ते ऑक्सिजन सोडते ज्यामुळे हवा रात्रभर ताजी राहते. त्याची काळजी घेणे सोपे आहे आणि कमी प्रकाशातही ते चांगले वाढते. त्यामुळे घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही हे रोप लावू शकता.

हेही वाचा >> Diwali 2023: दिवाळीत सोन्या, चांदीची चमक वाढवा; या सोप्या टिप्सनं घरीच करा दागिने पॉलिश

सूचना- या लेखात दिलेली माहिती, पद्धत आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Story img Loader