स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात यंदाचा १५ ऑगस्ट अगदी जल्लोषात साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा करताच आपणही अनेकांच्या सोशल मीडियाच्या डीपीवर तिरंगे पाहत असाल. अलीकडे उत्साही नवपालकांनी प्रत्येक सणाला आपल्या बाळाचे फोटोशूट करण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु केला आहे. बाळाच्या पहिल्या वर्षात प्रत्येक महिन्याला एक थीम घेऊन शूट केले जाते. कधी किचनची थिम तर कधी समुद्र किनाऱ्याचा सेट अप असे भन्नाट प्रयोग हे पालक करत असतात. अनेकदा त्या महिन्यात येणाऱ्या सणांवर आधारित शूट केले जाते. ऑगस्ट मध्ये येणारा स्वातंत्र्यदिन हा समस्त भारतीयांसाठी मोठा आणि महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने जर का आपणही आपल्या बाळाचे तिरंगा थीम मध्ये शूट करू इच्छित असाल तर त्यासाठी काही कल्पना आपण या लेखात पाहणार आहोत.
तिरंगा थीम बेबी फोटो शूट साठी तुम्ही घरातील केशरी, हिरवी व पांढरी ओढणी वापरू शकता. खाली पेस्टल रंगाची एखादी चादर घेऊन आपण वर विविध प्रकारे दुपट्टे सेट अप करू शकता. लक्षात घ्या की या ओढण्या शकतो कॉटनच्या व मऊ असाव्यात जेणेकरून बाळाच्या त्वचेला त्रास होणार नाही
आपण घरातील डाळी व तांदूळ वापरून सुद्धा फोटोशूट साठी सेट अप करू शकता. हिरव्या रंगासाठी मूग, केशरी साठी मसुर डाळ व पांढरे तांदूळ असा लुक पण फोटो मध्ये सुंदर दिसतो. आपण आपल्या बाळाला महात्मा गांधी, लोकमान्य टिळक किंवा भारतमातेच्या रूपातही तयार करू शकता.
बाळाचे फोटोशूट करण्यासाठी आपल्याला प्रोफेशनल फोटोग्राफर बोलवण्याची गरज नाही, फोनच्या कॅमेऱ्यातून सुद्धा आपण फोटो क्लिक करू शकता. फक्त आपल्याला अँगल कडे लक्ष द्यायचे आहे. शक्यतो हे फोटो टॉप म्हणजेच वरच्या अँगलने काढले जातात त्यामुळे बाळाला सेट अप मध्ये ठेवल्यावर एखाद्या टेबल वर किंवा सोफ्यावर उभे राहून फोटो काढावेत.