Independence day Tricolour Recipes: भारताचा स्वातंत्र्यदिन यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. आपल्याकडे कोणत्याही सणाचं सेलिब्रेशन हे चमचमीत पदार्थांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही आणि आपले राष्ट्रीय सण सुद्धा याला अपवाद नाहीत. दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाला तिरंगी ढंगात बनवलेल्या रेसपीज खवय्यांच्या सर्च लिस्ट मध्ये असतात. यंदा तुम्ही फार शोधाशोध करण्याआधी आम्हीच आपल्याला काही तिरंगी रेसिपीजचे पर्याय सुचवणार आहोत.

साधारणतः तिरंगा रेसिपीज मध्ये सँडविचचे निरनिराळे प्रकार नेहमीच केले जातात पण यंदा आपण त्यांना अस्सल भारतीय रेसिपी सह बदलू शकता. भारतात अनेक घरांमध्ये पराठा, थेपला, थालीपिठ असे नाष्ट्याचे पदार्थ बनतात त्यांना एक ट्विस्ट देऊन आपण तिरंगा साकारणार आहोत. आपण भात बनवताना सुद्धा याच पद्धतीने तिरंगी स्टाईलचा टच देऊ शकता.

केशरी पराठा

आपण मैदा किंवा गव्हाच्या पोलीस गाजर व मिक्स भाज्या घेऊन पराठा करू शकता.

हिरवा पराठा

मेथीचे थेपले सहसा पिवळसर होतात मात्र आपल्याला तिरंग्यातील हिरवा रंग हवा असल्यास पालक प्युरी वापरून पराठे बनवू शकता. यामध्ये पराठ्यांचा रंग बदलेल असे मसाले वापरणे टाळा.

Independence Day 2022: करोना, तिरंगा व.. स्वातंत्र्य दिनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ‘या’ वेशभूषा ठरतील लक्षवेधी; अशी करा तयारी

पांढरा पराठा

पांढरा पराठा करणे थोडं ट्रिकी असू शकते. आपण बटाटा किंवा फ्लॉवरचे सारण भरून मैद्याचे पराठे करू शकता.

Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त करणार आहात Baby Photoshoot? ‘या’ हटके आयडीया एकदा पहाच

हे पराठे दही, लोणचं आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता म्हणजे तुम्हाला संपूर्ण थाळीचा लुक तिरंग्याच्या थीम नुसार ठेवू शकाल.

यंदा भारतात हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे हे तर आपण जाणून असाल, भारतीय घर हे विविध रेसिपीज शिवाय अधुरे आहे त्यामुळे विविध तिरंगी पदार्थातून प्रत्येक घरात स्वातंत्र्यदिन साजरा करता येईल.

Story img Loader