गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी भारताने स्वतःची लस विकसित केली आहे. येत्या काही महिन्यांत, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील ही लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली जाईल, त्याची किंमत जवळपास २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असेल. जगात आतापर्यंत फक्त दोन कंपन्यांकडे हा आजार रोखण्यासाठी लस उपलब्ध होत्या. पण आता बायोटेक्नॉलॉजी विभाग आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या १० वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी स्वदेशी लस तयार आहे. लवकरच ही लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली जाईल.

यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह, म्हणाले की, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम ही निरंतर प्रक्रिया आहे. विद्यमान लसींचा यापूर्वी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. आता भविष्यात याचाही समावेश केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांत या लसीचे २०० दशलक्ष डोस तयार केले जातील आणि त्याची किंमत बाजारातील उर्वरित लसींपेक्षा कमी असेल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, काही महिन्यांत आम्ही ही लस लाँच करणार आहोत. या लसीची किंमत २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे, परंतु आम्ही येत्या काळात ते ठरवण्यासाठी मंत्रालयाशी बोलू. ही लस ९ ते २६ वयोगटातील तरुण युवती आणि महिलांना दिली जाऊ शकते.

Maharashtra no minimum support price
शेतीमालाला हमीभाव नाहीच, जाणून घ्या, हमीभाव किती, मिळणारा दर किती
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

(हे ही वाचा: Dengue Fever: किती दिवस असतो डेंग्यूचा ताप; तो पूर्णपणे बरा करण्यासाठी जाणून घ्या घरगुती उपाय)

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंधित विशेष तथ्ये

  • ९५% पेक्षा जास्त गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मानवी पॅपिलोमा विषाणूमुळे होतो.
  • भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या नंबरवर आहे.
  • भारतात १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ४८ कोटी ३५ लाख महिलांना या आजाराचा धोका आहे.

एम्सच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. नीरजा बाटला यांनी सांगितले की, याचा परवाना ९ ते ४५ वर्षे खूप विस्तृत आहे, परंतु आम्ही यावर भर देतो की तरुण मुलींना ही लस देण्यात यावी. याचे कारण असे आहे की हा विषाणूमुळे होतो, जो सामान्यत: ८०% महिलांमध्ये लग्नानंतर संसर्ग झाल्यामुळे होतो, त्यामुळे ते आधीच टाळता येऊ शकते.