उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना खेळायला भरपूर वेळ मिळणार आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले मैदानी खेळ खेळण्यामध्ये व्यस्त असायची, पण आता मात्र हातात मोबाइल किंवा टॅब घेऊन त्यावर गेम खेळण्यात, व्हिडीओज पाहण्यात व्यस्त असतात. आजकाल लहान मुले मोबाइल, लॅपटॉप कॉम्प्युटरसमोर जास्त वेळ घालविताना दिसतात. लहान मुलांच्या वाढत्या स्क्रीनटाईममुळे पालकांची मात्र चिंता वाढत आहे. उन्हाळ्यामध्ये मुलांच्या वाढत्या स्क्रीनटाईमबाबत जवळपास ८५ टक्के पालक चिंतित असल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमधून निदर्शनास आले आहे.

मुलांच्या वाढत्या स्क्रीनटाईमबाबत पालकांना सतावतेय चिंता

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे, भारतातील वेगवेगळ्या शहरांतील ८५ टक्के पालकांना त्यांच्या मुलांच्या वाढत्या स्क्रीनटाईमबाबत चिंता वाटत आहे. मार्च २०२३ मध्ये अमेझॉनच्या अलेक्साद्वारे कांतारने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जवळजवळ ९६ टक्के पालक त्यांच्या मुलांना शिक्षण आणि मजेदार खेळांमध्ये व्यस्त ठेवण्यासाठी स्क्रीनमुक्त कल्पना शोधत आहेत. भारतातील १० मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये लहान मुले (३-८ वर्षे) असलेल्या ७५० पेक्षा अधिक पालकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

agriculture benefit for traders and sellers in rbi report
शेती शेतकऱ्यांच्या नव्हे व्यापारी, विक्रेत्यांच्या फायद्याची ? जाणून घ्या, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील धक्कादायक माहिती
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
demand for bananas in navratri has decreased
नवरात्रातील उपवासकाळ असूनही केळ्यांना मागणी कमी
Encroachment of vendors on footpaths of Rana Pratap Nagar nagpur
नागपूर:राणा प्रतापनगरचे पदपथ विक्रेत्यांच्या ताब्यात
Queues of citizens, Dombivli Civic Facility Center,
कर्मचाऱ्यांअभावी डोंबिवली नागरी सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा
amazon india announces significant reduction in selling fees
ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली
Ikra predicts that banks will raise funds through bonds as growth in bank deposits slows
बँकांची रोख्यांवर मदार, ठेवीतील वाढ मंदावल्याने पाऊल; १.३ लाख कोटींच्या निधी उभारणीचा इक्राचा अंदाज

कांतार ही जगातील आघाडीची सल्लागार कंपनी आहे जी पुराव्यांवर आधारित आकडेवारी(insight) देते, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

८२ टक्के पालक मुलांना उन्हाळ्यांच्या सुट्टीत व्यस्त कसे ठेवायचे या चिंतेत

या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ८२ टक्के पालक आपल्या मुलांना उन्हाळ्यात व्यस्त ठेवण्याबद्दल चिंतित आहेत. ‘मुलांना मजा कशी करावी शिकण्यास मदत करणे (४१ टक्के)’, ‘नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांच्या उत्सुकतेला चालना कशी द्यावी (३७ टक्के)’ आणि ‘मुलांमधील कंटाळा सर्जनशील मार्गांनी कसा घालवावा (३० टक्के)’, अशा काही प्रमुख चिंता पालकांमध्ये दिसून आल्या.

मुले दररोज स्क्रीनवर ३ तासांपेक्षा जास्त वेळ घालवातात (freepik)
मुले दररोज स्क्रीनवर ३ तासांपेक्षा जास्त वेळ घालवातात (freepik)

मुले दररोज स्क्रीनवर ३ तासांपेक्षा जास्त वेळ घालवातात

सर्वेक्षण केलेल्या ९० टक्क्यांहून अधिक पालकांचा असा विश्वास आहे की, स्क्रीन डिव्हाइसवर जास्त वेळ घालवताना मुले कमी सक्रिय होतात. बहुसंख्यांना असे वाटते की, स्क्रीनवर घालविण्याचा आदर्श वेळ २ तासांपेक्षा कमी असावा, पण ६९ टक्के लोकांनी, त्यांची मुले दररोज स्क्रीनवर तीन तासांपेक्षा जास्त वेळ घालवतात हे मान्य केले.

हेही वाचा – उष्णतेच्या लाटेचा मानवी शरीरावर कसा होतो परिणाम? डॉक्टरांकडून जाणून घ्या, त्याची लक्षणे आणि प्रथमोपचार

पालक मुलांच्या स्क्रीनटाईमवर मर्यादा घालण्यावर देतात भर

“मुलांना नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता असते आणि त्यांना या प्रक्रियेत मजा करायची असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अधिक मोकळा वेळ असल्याने, पालकांना त्यांच्या मुलांना गुंतवून ठेवण्याचे मोठे काम असते. आमच्या सर्वेक्षणातून हे अधोरेखित होते की, पालक मुलांच्या स्क्रीनटाईमवर मर्यादा घालण्यावर भर देतात. पालक मुलांना अशा गोष्टींमध्ये गुंतवू पाहतात ज्यामुळे त्यांचे कौशल्य वाढेल आणि त्याचबरोबर त्यांना मजादेखील येईल,’ असे कांतरच्या आकडेवारी (Insight) विभागाचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक दीपेंद्र राणा यांनी सांगितले.

मुलांच्या वाढत्या स्क्रीनटाईमबाबत पालकांना सतावेतय चिंता ( Freepik)
मुलांच्या वाढत्या स्क्रीनटाईमबाबत पालकांना सतावेतय चिंता ( Freepik)

मुलांचा स्क्रीन उपकरणांचा वापर मर्यादित करू पाहताहेत पालक

सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, मुलांना त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा पुरेपूर उपयोग करण्यात मदत करण्यासाठी, पालकांनी इंग्रजी बोलणे (५० टक्के); नैतिकता आणि सामाजिक शिष्टाचार (४५ टक्के); नृत्य, गायन आणि वाद्य वाजवणे यांसारख्या कला सादर करणे (३६ टक्के); कला आणि हस्तकला (३२ टक्के); आणि शारीरिक हालचाल आणि मैदानी खेळ (३२ टक्के) अशा पर्यायांना महत्त्व देतात. याशिवाय, पालक मुलांचा स्क्रीन उपकरणांचा वापर मर्यादित करू पाहतात.

जिज्ञासा, एकाग्रता आणि संवाद यांसारखी कौशल्ये वाढवणारा आवाज-नियंत्रित स्मार्ट स्पीकर खरेदी करण्यात ६६ टक्के लोकांनी स्वारस्य दाखवले. सर्वेक्षणातील सहभागींच्या एका उपगटातील लोक अलेक्सा स्मार्ट स्पीकरचे वापरकर्ते होते.

हेही वाचा : शिंकायचंय पण शिंकता येईना? ‘हे’ उपाय करुन पाहा; नाक होईल साफ मग, घ्या मोकळा श्वास

मुलांच्या स्क्रीनटाईमबाबत अमेरिकन पेडिअ‍ॅट्रिक असोसिएशनने काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

१. १८ महिन्यापर्यंतच्या मुलांसाठी कोणताही स्क्रीनटाईम नसावा. म्हणजे इतक्या लहान मुलांसमोर कोणत्याही प्रकारचा स्क्रीन असू नये.
२. १८ महिने ते २४ महिने या वयोगटातील मुलांसाठी गरजेपुरता स्क्रीनटाईम असावा. म्हणजे एखादे गाणे असेल किंवा शालेय अभ्यासक्रमातील काही असेल तर तुम्ही त्यांना दाखवू शकता.
३. वय वर्षे २ ते ५ या वयोगटामधील मुलांसाठी फक्त १ तासाच्या स्क्रीनटाईमची शिफारस केली जाते.
४. वय वर्षे ६ ते १० या वयोगटामधील मुलांसाठी दीड तासाचा स्क्रीनटाईम दिला आहे.
५. वय वर्षे १२ ते १३ या वयोगटातील मुलांसाठी, जास्तीत जास्त २ तासांचा स्क्रीनटाईम सांगितला आहे.

मुलांच्या स्क्रीनटाइमचे मॅनेजमेंट करताना पालकांनी लक्षात ठेवायच्या गोष्टी

ऑनलाईन शाळा आणि क्लासेसमुळे मुलांचा स्क्रीनटाईम वाढला असला तरी त्यांच्या स्क्रीनटाईमकडे पालकांना लक्ष द्यावे लागेल. स्क्रीनटाईम कोणत्या गोष्टींसाठी देत आहोत, त्याचे चांगले-वाईट परिणाम यांची चर्चा केली पाहिजे. स्क्रीनटाईम कमी करणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे स्क्रीन डिपेंडन्सी कमी होते. म्हणजे मुलांना निंबध लिहायचा असेल, एखादा प्रोजेक्ट करायाचा असले तर मुले पटकन इंटरनेटवर सर्च करतात. हीच स्क्रीन डिपेंडन्सी मुलांमध्ये कमी करण्यासाठी स्क्रीनटाईम कशासाठी वापरत आहे याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

तुमच्या नजरेसमोर असलेला कोणताही स्क्रीन हा स्क्रीनटाईममध्ये गणला जातो. फक्त मोबाइलवर घालवलेला वेळ म्हणजे स्क्रीनटाईम नव्हे. जर पालक उठल्या उठल्या हातात मोबाइल घेत असतील मुलेही तेच शिकतात. आपण स्क्रीनटाईम कमी करतो म्हणजे आपण इंटरनेटवर जाण्याचे प्रमाण कमी करतो. आपण जेव्हा मुलांचा इंटरनेटवर जाण्याचा वेळ कमी करतो तेव्हा आपोआपच आपण त्यांचा स्क्रीनटाईम कमी करतो.