Indian Railway Rules For Female Passengers : भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. यामुळे रेल्वे प्रशासनाकडूनही अनेक गाड्या चालवल्या जातात. जेणेकरुण प्रवाशांना प्रवास करताना कोणताही त्रास होऊ नये. पण रेल्वेकडून ज्याप्रकारे सुविधा दिल्या जातात त्याचप्रकारे प्रवाशांना प्रवास करण्यासंदर्भातही काही नियम दिले आहेत. प्रवाशांना रेल्वेच्या या नियमांचे पालन करुनच प्रवास करावा लागतो. अनेकदा काहीप्रवासी विना तिकीट रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसून येते. मुळात विना तिकीट प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. असे करताना पकडले गेल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. पण महिलांसंदर्भात भारतीय रेल्वेचा एक खास नियम आहे, जो कदाचित अनेकांना ठावूक नसेल. चला तर हा नियम काय आहे जाणून घेऊ…
अनेकदा लोक असा प्रश्न विचारतात की, एकटी महिला ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करत असेल तर टीटीई तिला ट्रेनमधून खाली उतरवू शकतो का? अशा परिस्थितीत रेल्वेचे काही नियम आहेत ते जाणून घेणे गरजेचे आहे. जर एखादी महिला विना तिकीट एकटी प्रवास करत असेल तर टीटीई तिला ट्रेनमधून बाहेर काढू शकत नाही. पण तिच्याकडून कायदेशीर दंड घेऊ शकतात. यासोबतच एखादी महिला ट्रेनमधून एकटी प्रवास करत असेल तर ती तिची सीट बदलून घेऊ शकते किंवा बदलू शकते.
रेल्वेच्या निमयांनुसार, एखाद्या महिलेला तिकीट नसल्यामुळे ट्रेनमधून उतरवल्यास ती संबंधित टीटीईविरुद्ध रेल्वे प्राधिकरणाकडे तक्रार करु शकते. एकट्या महिलेला कोचमधून कोणत्याही रिकामी किंवा सुमसान रेल्वे स्थानकावर कधीही उतरवता येत नाही. जिथे महिलेच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी टीटीईला संबंधीत महिलेला उतरवता येत नाही. टीटीईने जरी तिला खाली उतरवले तरी इथून पुढे तिला सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी GRP किंवा RPF ची असेल. सुरक्षा कर्मचारी महिलेला एस्कॉर्ट करतील आणि तिला जिथे सोडले जाईल तिथे ती सुरक्षित आहे याची खात्री करतील. त्यानंतरच जीआरपी किंवा आरपीएफचे जवान ट्रेनमध्ये परततील.
स्लीपर क्लासच्या तिकीटावर एकटी महिला एसी क्लासमध्ये प्रवास करत असेल तर तिला पुन्हा स्लीपर क्लासमध्ये जाण्यास सांगितले जाऊ शकते. तिच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकत नाहीत. रेल्वे बोर्डच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह कोचमध्ये एकट्या महिलेचे नाव वेटिंग लिस्टमध्ये असले तरीही तिला ट्रेनमधून खाली उतरवता येत नाही.