Indian Railways New Tatkal Ticket Booking Timings :  भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत मोठे बदल केले आहेत, त्यामुळे पुढील काळात तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर बदललेल्या वेळांसंदर्भात आधी सविस्तर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोयीचे जावे यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

भारतीय रेल्वेच्या नव्या निमयानुसार, आता एसी क्लाससाठी तात्काळ तिकीट बुकिंग सकाळी १० वाजता सुरू होईल, तर नॉन एसी क्लाससाठी ही प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू होईल. यापूर्वी ही वेळ अनुक्रमे सकाळी ९ आणि १० अशी होती. ही सुविधा आपत्कालीन वेळी तात्काळ तिकीट बुक कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना सोयीची ठरणार आहे.

bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Online railway ticket purchases facility unavailable for disabled
अपंगांना ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग सुविधा केंव्हा मिळणार?
Problems faced by disabled passengers due to lack of online railway ticket purchase facility
ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड
Investigation into the bus procurement process of the State Transport Corporation has been initiated on the orders of Chief Minister Devendra Fadnavis Mumbai news
एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू; तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून निविदेत फेरफार केल्याचे उघड
Metro Project, Devendra Fadnavis, Metro Project Works,
मेट्रो प्रकल्प कामांचे वेळापत्रक करा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
Mahakumbh Mela is held at Prayagraj rail innovative initiative launched to simplify ticketing process
कुंभमेळ्याला गेलेल्या प्रवाशांना कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवरून मिळणार रेल्वेचे तिकीट
passenger and memu special trains running from cr bhusawal division of operated with regular numbers
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

तात्काळ रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी फॉलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया

१) तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम https://www.irctc.co.in/ वर जा आणि लॉगिन करा.

२) यानंतर Plan My Journey सेक्शनमध्ये जा. यानंतर कुठून ते कुठपर्यंत प्रवास करणार ते आणि प्रवासाची तारीख निश्चित करा.

३) आता बुकिंग टॅबमध्ये तत्काळ पर्याय निवडा आणि तुमच्या आवडीच्या ट्रेन आणि क्लास (एसी किंवा नॉन-एसी) वर क्लिक करा.

४) यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल, ज्यावर तुमचे नाव, वय आणि ओळखपत्र तपशील यांसारखी प्रवाशांची माहिती भरा.

हेही वाचा – Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;

५) सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे पर्याय दिसतील. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग आणि डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता.

६) पेमेंट केल्यानंतर तुम्हाला SMS आणि Email द्वारे तिकिटासंदर्भात माहिती पाठवली जाईल.

७) कन्फर्म तात्काळ तिकिटावर तुम्हाला रिफंड मिळत नाही. पण, तिकीट कन्फर्म न झाल्यास रक्कम परत केली जाईल.

भारतीय रेल्वेने हा बदल आपत्कालीन प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन केला आहे, यामुळे प्रवाशांना केवळ चांगली सुविधा मिळणार नाही तर त्यांची बुकिंग प्रक्रिया अधिक अखंड आणि जलद होईल. नवीन नियम आणि दिलेली प्रोसेस फॉलो करून तुम्ही तुमचा प्रवास सुरळीत आणि तणावमुक्त करू शकता.

Story img Loader