रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी तुमच्यासाठी नककीच उपयोगी आहे. जर तुमच्याकडे कन्फर्म ट्रेन आरक्षण तिकीट असेल, पण तुम्ही इतर काही महत्त्वाच्या कामामुळे प्रवास करू शकत नसाल, तर तुम्ही हे तिकीट तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला ट्रान्सफर करू शकता. याशिवाय तुम्ही ही तिकिटे कोणत्याही गरजूला देऊ शकता. या खास सुविधेबद्दल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “जो सीन माझ्या कारर्किदीतला…”, ‘रानबाजार’ सीरिजमधील भूमिकेविषयी प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सुविधा

रेल्वे प्रवाशांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो की तिकीट बुक केल्यानंतर ते प्रवास करू शकत नाहीत, अशा परिस्थितीत एकतर त्यांना तिकीट रद्द करावे लागते आणि त्यांच्या जागी पाठवलेल्या व्यक्तीचे नवीन तिकीट घ्यावे लागते. पण त्यानंतर कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड असते. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांना ही सुविधा दिली आहे. जरी ही सुविधा बर्याच काळापासून अस्तित्वात आहे, तरी लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. रेल्वेच्या या सुविधेचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आणखी वाचा : “असा चित्रपट करताना लाज वाटली पाहिजे…”, ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावरून केआरकेने केली अक्षय कुमारवर टीका

तुमचे तिकीट कुटुंबातील सदस्यांना ट्रान्सफर करा

एखादा प्रवासी त्याचे कन्फर्म केलेले तिकीट त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे की वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी रिक्वेस्ट पाठवावी लागते. यानंतर, तिकिटावर प्रवाशाचे नाव काढण्यात येते आणि ज्या सदस्याच्या नावावर तिकीट ट्रान्सफर करण्यात येते.

आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”

अर्ज २४ तास अगोदर द्यावा लागेल

जर प्रवासी सरकारी कर्मचारी असेल आणि त्याच्या ड्युटीसाठी जात असेल तर तो ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी रिक्वेस्ट पाठवू शकतो, ज्या व्यक्तीसाठी रिक्वेस्ट केली आहे, त्याच्या नावावर हे तिकीट ट्रान्सफर केले जाईल. लग्नाला जाणाऱ्या लोकांसमोर अशी परिस्थिती आल्यास लग्न आणि पार्टीच्या आयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह ४८ तास आधी अर्ज करावा लागतो. ही सुविधा तुम्ही ऑनलाइनही मिळवू शकता. ही सुविधा एनसीसी कॅडेट्ससाठीही उपलब्ध आहे.

आणखी वाचा : “जॉनी डेपला ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई देऊ शकत नाही…”, अँबर हर्डच्या वकिलाचे वक्तव्य चर्चेत

फक्त एकदा संधी मिळवा

भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की तिकिटांचे ट्रान्सफर फक्त एकदाच केले जाऊ शकते, म्हणजे जर प्रवाशाने त्याचे तिकीट दुसर्‍या व्यक्तीला एकदा हस्तांतरित केले असेल तर तो ते बदलू शकत नाही, म्हणजेच आता हे तिकीट इतर कोणालाही ट्रान्सफर केले जाऊ शकत नाही.

आणखी वाचा : चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेणारा अक्षय एका जाहिरातीसाठी किती पैसे घेतो माहितये का?

ट्रेनचे तिकीट कसे ट्रान्सफर कराल?

१. तिकिटाची प्रिंट काढा.
२. जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काउंटरला भेट द्या.
३. ज्यांच्या नावावर तिकीट हस्तांतरित करायचे आहे, त्याचा ओळखपत्र जसे की आधार किंवा मतदान ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
४. काउंटरवर तिकीट ट्रान्सफरसाठी अर्ज करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railways other person can also travel on your train ticket know this facility of railway dcp