सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये लिपिक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. कनिष्ठ लिपिक पदाच्या १७१ तर वरिष्ठ लिपिक पदाच्या ८० जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण २५१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. २० डिसेंबरपासून या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. तसंच १९ जानेवारी ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. १९ जानेवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
१२ उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. तसंच उमेदवारांना टायपिंग येणं अनिवार्य आहे. यासाठी इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट आणि हिंदीचा टायपिंग स्पीड २५ शब्द प्रति मिनिट असावा लागेल. तर वरिष्ठ लिपिक वर्गासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय ४२ वर्षांपेक्षा अधिक असून नये. तसंच ओबीसी आणि एससी/एसटी वर्गातील उमेदवारांना अनुक्रमे ३ आणि ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.
अशी होणार निवड
कंम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची टायपिंगची परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.
कसा कराल अर्ज ?
इच्छुक उमेदवारांना http://www.rrccr.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.