सौदी अरेबियातील फूड फेस्टिवलमध्ये भारतीय हॉटेल्सकडून कबाब आणि बिर्याणीचे विविध प्रकार सादर करण्यात आले आहेत. २८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या फूड फेस्टिवलमध्ये अफागाणी बिर्याणी, हैदराबादी चिकन बिर्याणी, चिकन टिक्का बिर्याणी, मुघलाई बिर्याणी, लखनवी बिर्याणी, मलबार बिर्याणी असे बिर्याणीचे विविध प्रकार भारतीय हॉटेल्सकडून सौदी अरेबियन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
भारताकडून शेफ चंद्रा प्रकाश या फूड फेस्टिवलचे प्रतिनिधीत्व सांभाळत आहेत. बिर्याणी सोबत कबाबचेही विविध प्रकार या फेस्टिवलमध्ये सादर करण्यात आले आहेत. 

Story img Loader