वैज्ञानिकांनी एक मोठे यश प्राप्त केले असून त्यांनी डोळ्यातील कोर्नियाच्या नवीन थराचा शोध लावला आहे. या कोर्नियाचे नाव त्याचे संशोधन करणा-या भारतीय संशोधकाच्या नावावरून ठेवण्यात येणाचा निर्णय घेण्यात आला आहे. मानवी डोळ्यातील काळ्या बुबुळास ‘कोर्निया’ असे म्हटले जाते.
ब्रिटेनमध्ये ‘युनिवर्सिटी ऑफ नॉटिंघम’च्या संशोधकांद्वारे करण्यात आलेल्या या शोधामुळे चिकित्सकांना कोर्निया ग्राफ्टिंग करणा-या किंवा कोर्निया प्रत्यारोपण करणा-या रुग्णांना अधिक चांगला परिणाम देण्यास मदत मिळणार आहे. कोर्नियाच्या या नव्या शोधाचे नाव संशोधक हरमिन्दर दुआ यांच्या नावावरून “दुआ’ज लेयर” असे ठेवण्यात आले आहे. यापूर्वीच्या वैज्ञानिकांना कोर्नियाच्या नव्या थराबाबत कोणतीही माहिती नव्हती.
मानवी डोळ्याच्या बुबुळावर एक साफ संरक्षणात्मक लेन्स असते ज्याद्वारे प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो. शास्त्रज्ञांना पूर्वी विश्वास होता की, कोर्नियाचे समोरपासून ते मागेपर्यंत पाच थर असतात ज्यांना कोर्नियल ऐपिथेलियम, बोमॅन्स लेयर, कोर्नियल स्ट्रोमा, डिसेमेट्स मैम्ब्रेन आणि कोर्नियल एंडोथेलियम असे म्हटले जाते. नवीन शोध घेण्यात आलेला नवीन थर हा कोर्नियल स्ट्रोमा और डिसेमेट्स यांच्यामध्ये स्थित आहे. केवळ १५ मायक्रोन्स जाडी असली तरी हा थर फार मजबूत आहे. पूर्ण कोर्नियाची जाडी अंदाजे ५५० मायक्रोन्स किंवा ०.५ मिमी असते. हा एक मोठा शोध आहे, ज्यामुळे नेत्र चिकित्सेसंबंधीची सर्व पुस्तके पुन्हा लिहण्याची गरज आहे, असे प्रोफेसर दुआ यांनी सांगितले.
प्रोफेसर दुआ म्हणाले की, कोर्नियाच्या या नव्या आणि अनोख्या थराच्या शोधानंतर आम्ही याच्या दबाव सहन करण्याच्या क्षमतेचा उपयोग करुन रुग्णांच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने करण्याच्या संभाव्य बाबींचा शोध घेऊ शकतो.
हा अहवाल ‘जर्नल ऑप्थॅमॉलॉजी’ येथे प्रदर्शित करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा