सांध्यांजवळचे हाड आणि अस्थिंवरील मृदु पेशींचे आवरण यांच्याजवळ होणाऱया वेदना असा संधिदाह आजार पासष्टीनंतर सुरू होतो. परंतु, जर लहान वयात हा आजार झाला तर वाढत्या वयानुसार ही अधिकाअधिक वेदनादाय़ी ठरतो.
या आजाराने पीडित असलेल्या रुग्णांची वयोमर्यादा तरुण वयोगटापर्यंत येऊन पोहोचली असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे याचा कामावरही परिणाम होतो. संधिदाहामुळे तरुणांचे कामात दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे, पोषणाचा अभाव, स्थूलपणा, चुकीचा दिनक्रम या सर्वांचा संधिदाह होण्याशी खूप जवळचा संबंध आहे.
यासाठी शरिराचे वजन योग्य राहील याची काळजी घेणे, नियमीत व्यायम करणे, सांधे सुरक्षीत राहतील याची काळजी घेणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Story img Loader