सणासुदीचा काळ लक्षात घेऊन आता विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशाच प्रकारे एक भन्नाट ऑफर इंडिगो एअरलाइन्सने आणली आहे. इंडिगोने ‘दिवाळी सेल’ या नावाने ही ऑफर सुरू केली आहे.


तीन दिवसांसाठी असलेली ही ऑफर 26 ऑक्टोबर 2018 रोजी संपणार आहे. या अंतर्गत डोमेस्टिक प्रवासासाठी 899 रुपायांच्या तिकिटापासून सुरुवात होत आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कमीत कमी 3 हजार 399 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच रेल्वेच्या तिकीटदराएवढे किंवा त्यापेक्षाही कमी दरात विमान प्रवास करता येणार आहे. 10 लाख तिकीटांसाठी ही ऑफर आहे. यामध्ये खरेदी केलेल्या तिकीटावर 8 नोव्हेंबर 2018 ते 15 एप्रिल 2019 पर्यंत प्रवास करता येईल. कोणकोणत्या मार्गांवर ही ऑफर उपलब्ध आहे याबाबतची माहिती इंडिगोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.