मधुमेह असलेल्यांनी गोड खाऊ नये असा सल्ला दिला जातो. केवळ गोड खाणे हेच मधुमेह होण्यामागील कारण नाही. तर आरोग्य तज्ज्ञांनुसार, चुकीचा आहार आणि असंतुलित जीवनशैली देखील मधुमेहासाठी जबाबदार आहे. लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत. मधुमेहावर आत्तापर्यंत कुठले विशेष उपचार नाही. त्यामुळे, डॉक्टर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषक आहार आणि संतुलित जीवनशैली पाळण्याचा सल्ला देतात. काही औषधी वनस्पतींचे सेवन करून देखील मधुमेह नियंत्रणात ठेवता येऊ शकते. या औषधी वनस्पतींविषयी आपण जाणून घेऊया.
१) मेथी
मेथी चवीला कडू असते. मात्र ती वजन आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करू शकते. उपाशीपोटी मेथीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत होते. मेथी ग्लुकोज टॉलरेन्समध्ये सुधार करू शकते, त्याचबरोबर एलडीएल आणि ट्राइग्लिसराइड कमी करू शकते.
(वजन कमी करायचे आहे? शिंगाड्याचे असे करा सेवन)
२) दालचिनी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनी फायदेशीर आहे. दालचिनी जेवल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. त्याचबरोबर, दालचिनी शरीरातील अतिरिक्त फॅट कमी करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी मदत करते.
३) आले
आल्यामध्ये अँटी-डायबिटिक, हाइपोलिपिडेमिक आणि अँटी – ऑक्सिडेटिव्ह गुण असतात. त्याचबरोबर, आले चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करते आणि रक्तातीस साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. मात्र, आले मुळातच गरम असेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्याचे सेवन करावे.
४) काळी मिरी
काळी मिरी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. काळी मिरीत पीपरिन नावाचे पदार्थ असते जे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते.
(पांढऱ्या पावाचे अधिक सेवन टाळा, आरोग्याला होऊ शकतात ‘हे’ 3 नुकसान)
५) जिनसेंग
जिनसेंग हे चीन, नेपाल, कॅनडा आणि पूर्व अमेरिकेत आढळणाऱ्या वनस्पतीचे मूळ आहे. जिनसेंग स्वादुपिंडात इन्सुलिनचे उत्पादन वाढवण्याच्या कार्याला वेग देऊन शरीरात कार्बोदकांचे शोषण कमी करते, ज्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते.
६) गुळवेल
या वनस्पतीची पाने रक्तातील साखरेचे प्रमाण आणि मधुमेहाच्या इतर लक्षणांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रभावी आहे. ही औषधी वनस्पती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यातही मदत करते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)