How To Live Stress Free: आजच्या काळात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावात असतो. तणावाखाली राहिल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच तणावाच्या परिस्थितीत तुम्ही स्वत:ला शांत ठेवणे महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला तणावापासून दूर राहण्यासाठी अनेक युक्त्या सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तणावपूर्ण परिस्थितीतही स्वतःला शांत ठेवू शकता.
श्वासोच्छवासाचे व्यायाम करून पहा
जर तुम्ही तणावपूर्ण परिस्थितीत असाल आणि तुम्हाला चिंताग्रस्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करावे. असे असे तज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि सोडा तसंच तुमचा मेंदू शांत ठेवण्यावर भर द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्याल, तेव्हा तुमचे मन शांत होईल आणि तणावपूर्ण परिस्थितीत तुम्ही स्वतःला शांत ठेवू शकाल.
( हे ही वाचा: COVID Symptoms 2022: ताप, खोकला नाही तर ‘ही’ ३ विचित्र लक्षणे आता करोना रुग्णांमध्ये दिसत आहेत; वेळीच सावध व्हा)
तुमच्या जिभेवर मीठ ठेवा
ही पद्धत तुम्हाला विचित्र वाटेल, परंतु तज्ञांचे असे मत आहे की या पद्धतीने तुमचे मन सहज शांत होऊ शकते. खरं तर, जेव्हा तुम्ही तुमच्या जिभेवर मीठ लावता, तेव्हा तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत आहात त्यापासून तुमचे मन थोडेसे विचलित होते. या युक्तीसाठी, तुम्हाला तुमच्या जिभेवर थोडेसे मीठ ठेवावे जिभेवर मीठ ठेवल्याने तहानही लागते आणि तणावाच्या वेळी पाणी प्यायल्याने मन देखील शांत होते.
तळहातात बर्फाचे तुकडे धरा
जर तुम्हाला कधी एखाद्या गोष्टीबद्दल तणाव किंवा चिंता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या तळहातावर बर्फाचा तुकडा ठेवून तळहात बंद करा. तज्ञांचा असा विश्वास आहे की असे केल्याने, तळहातातील बर्फाच्या घनतेमुळे तुमचे लक्ष तुम्हाला त्रास देणाऱ्या विचारांपासून दूर जाईल