वजन कमी करण्यासाठी लोक अनेक योजना वापरतात. महागडे डाईट प्लॅन, उपवास करणे, अशी अनेक कामे करतात. यात काही लोक रात्रीचे जेवणे देखील टाळतात. मात्र रात्री उपाशी राहाणे हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अधिक काळ उपाशी राहिल्याने भोवळ येऊ शकते, तसेच अशक्तपणा वाटू शकतो. त्याचबरोबर शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळत नाही. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण टाळत असाल तर उपाशी न राहाता तुम्ही या पदार्थांचे सेवन केल्यास निरोगी राहण्यासोबतच तुम्हाला पोटही भरल्यासारखे वाटेल.
१) फायबर असलेले पदार्थ खा
तज्ज्ञांच्या मते वजन कमी करणाऱ्यांनी फायबर असलेले पदार्थ खालले पाहिजे. फायबर असलेले पदार्थ खालल्याने अशक्तपणा होत नाही आणि भूकही लागत नाही.
२) ओट्सचे वडे
ओट्समध्ये फायबरसह अनेक पोषक तत्व असतात. तुम्ही रात्री ओट्सचे वडे बनवून खाऊ शकता. ओट्सपासून शरीराला योग्य प्रमाणात फायबर मिळते आणि यामुळे चयापचय पातळी चांगली राहाते.
(नवरात्रीत ‘या’ पदार्थांचे करा सेवन, वजन कमी होण्यासह इम्युनिटी वाढण्यात होईल मदत)
३) क्विनोवा उपमा
क्विनोवाला फायबरचे उत्तम स्त्रोत मानले जाते. तुम्ही संध्याकाळी याचे सेवन केल्यास तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. क्विनोवामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने चयापचय क्रिया चांगली राहाते. तुम्ही क्विनोवा वेज उपमा खाऊ शकता. या पदार्थापासून फायबरच नव्हे तर अनेक जीवनसत्वे देखील मिळतात.
४) ड्राई पोहा स्नॅक
वजन कमी करण्यासाठी रात्री जेवण टाळत असाल तर तुम्ही ड्राई पोहा स्नॅक खाऊ शकता. ड्राई पोहा स्नॅक बनवण्यासाठी एका कढईत थोडे ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात पोहे भाजून घ्या. यामध्ये तुम्ही शेंगदाने देखील टाकू शकता. संध्याकाळी मर्यादित प्रमाणात याचे सेवन करा.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)