चहाला ज्याप्रमाणे अमृत मानले जाते त्याचप्रमाणे मागच्या काही काळात कॉफी पिणे हा स्टेटस सिम्बॉल बनला आहे. पूर्वी चहाला पर्याय म्हणून असणारी कॉफीची ओळख आता बदलली असून एकमेकांसोबत डेट करण्यापासून ते मिटींगला भेटल्यावरही कॉफीला प्राधान्य मिळताना दिसते. कॉफी हे पेय अरबस्थानमधून भारतात आले असे मानले जाते. कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्यापासून कॉफी बनवतात. भारतामध्ये कॉफीचे उत्पादन विशेषत: दक्षिणेकडील-बंगळुरू, उटी, म्हैसूर, केरळ या राज्यांमध्ये होते. डोंगरउतारावर रांगेत कॉफीच्या वृक्षांची लागवड केली जाते. कॉफी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन स्फूर्ती येते. सुस्ती व आळस कमी होऊन मेंदूला चालना मिळते तसेच मज्जासंस्थेलाही उत्तेजना मिळण्यास मदत होते. जगभरात आजचा दिवस जागतिक कॉफी डे म्हणून साजरा केला जात असताना कॉफी पिण्याचे शरीराला होणार फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयस्कर लोकांमध्ये हृदयाची क्रिया सुधारण्यास मदत – चहा-कॉफी पिणे आरोग्यासाठी वाईट असते असे म्हटले जाते. मात्र वयस्कर लोकांमध्ये हृदयाचे कार्य सुरळीत करण्यास कॉफी उपयुक्त ठरते असे जर्मनीमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. कार्डिओव्हस्क्युलर सेल्स खराब होऊ नयेत म्हणून कॉफीची मोठी चळवळही सुरु करण्यात आली होती.

यकृताचे कार्य सुरळीत होण्यास मदत – कॉफी प्यायल्याने यकृताचा सिरोसिस होण्याची शक्यता कमी असते. रोज १ कप कॉफी प्यायल्यास ही शक्यता २२ टक्क्यांनी कमी होते तर २ कप कॉफी प्यायल्यास ४३ टक्के कमी होते.

टाईप २ डायबेटीस होण्याची शक्यता कमी होते – डेन्मार्क येथे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार कॉफीच्या सेवनाने टाईप २ डायबेटीस होण्याची शक्यता कमी असते. कॉफीमध्ये कॅफेनशिवाय असणारे घटक यामध्ये उपयुक्त ठरतात.

ऊर्जा टिकून राहण्यास मदत – सकाळी व्यायामाच्याआधी कॉफी पिण्याने तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला व्यायाम करताना थकवा आल्यासारखे वाटत नाही. कॅफीनमुळेही तुम्ही ताजेतवाने राहण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International coffee day benefits of drinking coffee
Show comments