प्रत्येकजण आयुष्यात कितीही दु:ख असले तरी छोट्या- छोट्या गोष्टीतून आनंद शोधत असतात, घेत असतात. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी आहे. मन आनंदी असेल तर शरीर निरोगी राहते असे म्हणतात. पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात आनंदाचे क्षणं शोधणं अवघड झालं आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदारी, नैराश्यामुळे आपण आनंदी राहणं विसरतोय. छोट्या-छोट्या गोष्टीतील आनंद घेण्यापासून दूर राहतोय. यामुळे दरवर्षी 20 मार्च रोजी ‘इंटरनॅशनल डे ऑफ हॅप्पीनेस’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणण्याची संधी मिळते. यामुळे जाणून घेऊ या दिवसाचा इतिहास, यंदाची थीम आणि आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचे पाच सोपे मार्ग…
इतरांना आनंदी ठेवण्याचे ५ सोप्पे मार्ग
१) स्वादिष्ट जेवण बनवा.
एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा सर्वोत सोप्पा मार्ग म्हणजे स्वादिष्ट जेवण. कारण जेवण ही अशी कला आहे ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या ह्रदयात स्थान निर्माण करता करते. तुम्ही आवडत्या व्यक्तीला यादिनानिमित्त किंवा केव्हाही आवडता केक, ब्राऊनी तसेच त्यांचा कोणता आवडता पदार्थ बनवून देत खूश करु शकता.
२) छानसं पत्र लिहा.
पत्र ही एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याची सर्वात जुन्या पद्धत आहे. तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्या बोलून व्यक्त होण्यापेक्षा पत्राच्या माध्यमातून सांगू शकता. पूर्वीच्या काळी घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्ती पत्राच्या माध्यमातूनचं आपली खुशाली, अडचणी घरच्यांना देत होते. पण आत्ताही आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला पत्रातून एक वेगळा आनंद देऊ शकता. .
३) गाणं.
तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल काय वाटते आणि तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता हे सांगण्यासाठी गाणं हा सर्वोत्तम मार्ग आहेत. तुम्ही त्या व्यक्तीसाठी एक गाणं गाऊ शकता किंवा एखादं गाणं रेकॉर्ड करुन पाठवू शकता. कारण भावना व्यक्त करण्यासाठी गाण्याशिवाय दुसरा कोणता बेस्ट पर्याय नाही.
४) प्रेमाने मिठीत घ्या.
प्रेमाची एक मिठी अनेक दुख:, व्यथा विसरण्यास भाग पाडते. त्यामुळे तुमच्या प्रियजनांना एक प्रेमाची मिठी मारत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकता.
५) फुलगुच्छ
एखाद्या व्यक्तीचा दिवस खास बनवण्यासाठी फुलांपेक्षा चांगली भेट असू शकत नाही. काही रंगीबेरंगी फुलांची निवड करत एक सुंदर फुलांचा गुच्छ करत एखाद्या व्यक्तीला द्या, त्यात त्या व्यक्तीप्रतीच्या भावना अगदी थोडक्यात एका चिठ्ठीवर लिहा. हा फुलगुच्छ पाहून कोणतीही व्यक्ती आनंदी होणार नाही असं होणारचं नाही.
‘इंटरनॅशन डे ऑफ हॅप्पीनेस’ केव्हापासून साजरा होऊ लागला?
सर्वप्रथम युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ठराव केला की, आनंद हा मूलभूत मानवी हक्क असावा, तसेच प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हा मानवी आनंद आणि त्यांची जीवनशैली सुधारण्यावर आधारित असावा. यानंतर २०१२ मध्ये इंटरनॅशन डे ऑफ हॅप्पीनेस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. खऱ्या अर्थाने २०१३ मध्ये सर्वप्रथम ‘इंटरनॅशनल डे ऑफ हॅप्पीनेस साजरा करण्यात आला.
यंदाची थीम
बी माइंड, बी ग्रेट फूल, बी काइंड (Be Mindful. Be Grateful. Be Kind) अशी यंदाची इंटरनॅशनल डे ऑफ हॅप्पीनेसची थीम आहे.