International Day of Yoga 2023: भारतासह जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करायला २०१५ पासून सुरुवात झाली. २१ जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव दिला होता. या भाषणात मोदी म्हणाले की योग ही “भारताची देणगी” असून तो जगभरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
यंदाच्या २०२३ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे?
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘मानवतेसाठी योग’ (Yoga for Humanity) अशी आहे. योगाच्या विविध शैलींमध्ये शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान किंवा विश्रांती यांचा समावेश होतो.
योग करण्याचे फायदे –
योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचा यामध्ये समावेश आहे. तसेच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करणे आणि झोपेत सुधारणा करण्यासाठी योग महत्वाची भूमिका बजावतात.
हेही वाचा- Video: झाडाला पाणी घालायला विसरलात तरीही रोप राहिल ताजे; ‘हा’ स्वस्त जुगाड पाहाच
योगाचे फायदे –
- लवचिकता
योग तुमची हालचाल आणि लवचिकता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमच्या शाररीक वेदना कमी होण्यास आणि एकूण गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.
- मजबूत स्नायू –
योगामुळे तुमचे स्नायू बळकट होण्यास मदत होते, तुमच्या मुख्य स्नायूंसह, ज्यामुळे तुमची मुद्रा आणि संतुलन सुधारू शकते.
- तणाव कमी होतो –
योगामुळे मन आणि शरीर शांत होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.
- झोप सुधारते –
योगामुळे शरीर आणि मन शांत होऊन शांत झोप घेता येऊ शकते.
- ऊर्जा वाढते-
योगासने रक्ताभिसरण सुधारून आणि थकवा कमी करून ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करू शकतात.
- वजन कमी होणे –
योग कॅलरी बर्न करते आणि चयापचय सुधारधे ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
- मानसिक संतुलन सुधारते –
योगामुळे चिंता, नैराश्य आणि तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन कसा साजरा करायचा?
आंतरराष्ट्रीय योग दिन हा दिवस योगाबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचे अनेक फायदे अनुभवण्यासाठी साजरा केला जातो. तुम्हाला जर योग करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही एखादा योगा क्लास शोधू शकता शिवाय ऑनलाइन किंवा पुस्तकातूनही योग शिकू शकता. यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन कसा साजरा करू शकतो याबद्दलचे काही पर्याय खाली दिले आहेत.
- योगा वर्गात जा
- घरी योगासने करा.
- योगाबद्दलचा इतिहास जाणून घ्या.
- सोशल मीडियावर योगाबद्दलचे तुमचे अनुभव शेअर करा.
- इतरांना योग करण्यासाठी प्रोत्साहित करा.