आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस.. शाकाहार हा मानवी शरीरासाठीच नव्हे तर निसर्गासाठी, पर्यावरणासाठी किती उपयुक्त आहे, शाकाहाराचं महत्व, माहिती सर्वसामान्यांना व्हावी, त्यांनी शाकाहाराचा अंगीकार करावा, यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. आरोग्य तसेच तंदुरुस्ती राखण्यासाठी अनेकजण शाकाहाराचा मार्ग निवडतात. बर्‍याच सेलिब्रिटींनी शाकाहार अंगीकारला आहे. हे सेलिब्रिटीं मांसाहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात.

१. जॉन अब्राहम</strong>


अभिनेता जॉन अब्राहम बॉलिवूडचा माचोमॅन म्हणूनही ओळखला जातो. जॉन स्वतःही मांसाहारी पदार्थ खात नाही आणि इतरांनाही फक्त शाकाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला देतो. फिटनेसच्या बाबतीत जॉन मोठमोठ्या कलाकारांना मागे टाकतो.

२. शाहिद कपूर

शाहिद कपूरने ‘लाइफ इज फेयर’ पुस्तक वाचल्यानंतर शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. कोणतेही प्रोटीन सप्लिमेंट्स न घेता जास्तीत जास्त व्यायाम आणि शाकाहारवर तो भर देतो. २०१७ मध्ये शाहिद ‘सेक्सिएस्ट एशियन मेन्स’च्या यादीत अग्रस्थानी होता.

३. अमिताभ बच्चन</strong>


अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. ७५ व्या वर्षीही ते बर्‍याच उत्साहाने कार्यक्रम सादर करतात. बिग बी पौष्टिक आणि सकस अन्‍नाला प्राधान्य देतात. त्यांना इडली सांबार खूप आवडतं. भेंडीची भाजी, मुगाची डाळ, पालक पनीर हे पदार्थ त्यांना आवडतात. दिवसभरात ते मोड आलेली कडधान्ये खातात.

४. आमिर खान</strong>


आमिर खान सुरुवातीला मांसाहारी होता पण काही वर्षांपूर्वीच त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडून दिलं. वयाच्या पन्नाशीचा टप्पा पार करून देखील आमिर फिटनेसच्या बाबतीत सर्वांवर मात करतो.

५. आर. माधवन


तरूणींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता आर. माधवनही शाकाहारी आहे. माधवन इतरांनाही मांसाहारी पदार्थ खाणे टाळण्याचा संदेश देतो.