International Women’s Day 2022: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी मुख्यत्वेकरुन महिलांना एखादी भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र अनेक वेळा महिलांना कोणती भेटवस्तू द्यावी याविषयी पुरुषांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरातल्या स्त्रियांना एखादं गिफ्ट द्यायचं असेल तर या पर्यायांचा नक्कीच विचार करायला हवा.
फिटनेस ट्रॅकर (Fitness Tracker)
आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याबाबत खूप सावध झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्याला फिटनेस बँड किंवा ट्रॅकर गिफ्ट केल्यास त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त गिफ्ट असेल. यावरून तुम्ही त्यांची किती काळजी घेत आहात हे दिसून येईल.
रूम ह्यूमिडिफायर (Room Humidifier)
महिला आणि मुलींसाठी त्यांची त्वचा खूप खास असते. स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी स्किनकेअरची खास दिनचर्या अवलंबतात. ह्युमिडिफायर पुरेशा प्रमाणात आर्द्रता प्रदान करून त्वचेचे पोषण करण्यास देखील मदत करते. हे गिफ्ट केल्याने तुमच्या खिशावर जास्त भार पडणार नाही, कारण ह्युमिडिफायर खूप स्वस्त आहेत.
(हे ही वाचा: Women’s Day 2022: गिफ्ट म्हणून ‘या’ उपयुक्त पर्यायांचा नक्की करा विचार)
व्हिडीओ फ्रेम (Video Frame)
पूर्वीचे लोक अनेकदा काही प्रसंगी फोटो फ्रेम्स भेट देत असत. पण आता काळ बदलला आहे. भेट म्हणून, तुम्ही एका महिलेला व्हिडीओ फ्रेम भेट देऊ शकता. या व्हिडीओ फ्रेममध्ये तुम्ही त्या क्षणांचे छायाचित्र टाकू शकता, जे विशेष आहेत. व्हिडीओ फ्रेममध्ये फोटो सतत हलतो. हे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरी बसवता येते.
जीपीएस ट्रॅकर/टाइल ट्रॅकर (GPS Tracker /TILE Tracker)
आपल्यापैकी बरेच जण वस्तू कुठेतरी ठेवायला विसरतात आणि मग घरभर शोधत राहतात. विशेषत: चाव्या आणि इतर लहान गोष्टी विसरल्या जातात. अशा परिस्थितीत तुम्ही टाइल ट्रॅकर भेट देऊन त्यांचा त्रास कमी करू शकता. वास्तविक, टाइल ट्रॅकर हे एक छोटेसे उपकरण आहे जे बॅग, पर्स किंवा चावीवर बसवले जाऊ शकते आणि मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे त्याचे स्थान ट्रॅक केले जाऊ शकते.
(हे ही वाचा: स्ट्रॉबेरी वजन कमी करण्यास करू शकते मदत; जाणून घ्या या फळाचे फायदे)
हेयर ड्रायर (Hairdryer )
अनेक स्त्रियांसाठी, हेअर ड्रायर केवळ एक गॅझेट नाही तर एक गरज आहे. विशेषतः अशा महिलांसाठी जे ऑफिस आणि घर दोन्ही आघाड्यांवर काम करतात. वेळेच्या कमतरतेमुळे त्यांना केस सुकवायला वेळ मिळत नाही. म्हणूनच तुम्ही हेअर ड्रायर भेट देऊ शकता.