आज २१ जून म्हणजेच जागतिक योगदिन. २०१५ पासून २१ जून हा जागतिक योगदिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. आज योगदिनानिमित्त जाणून घेऊयात दहा आसनांबद्दल
वीरभद्रासन
भगवान शंकराचा गण असलेल्या वीरभद्र या नावावरून या आसनाला वीरभद्रासन असे नाव पडले आहे. इंग्रजीमध्ये या आसनाला वॉरिअर पोझ असे म्हटले जाते. या आसनाचे दोन प्रकार आहेत. सध्या आपण वीरभद्रासन १ हा प्रकार पाहू. या आसनामुळे हात, खांदे, गुडघे, मांडय़ा आणि कंबरेचे स्नायू बळकट होतात.
येथे क्लिक करुन वाचा वीरभद्रासन संदर्भातील अधिक माहिती
या आसनाचे नाव बद्धकोनासन ठेवले गेले ते त्याच्या करण्याच्या विशिष्ट पद्धतीवरून. पायाची दोन्ही पावले जांघेजवळ दुमडली जातात आणि त्यांना हातांनी घट्ट धरून ठेवले जाते, जसे काही त्यांना एका विशिष्ट कोनामध्ये बांधून ठेवले आहे. या आसनाला फुलपाखरासारखे आसन असेही म्हटले जाते.
येथे क्लिक करुन वाचा बद्धकोनासन संदर्भातील अधिक माहिती
या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ठ, अपचन दूर होण्यास मदत होते.
येथे क्लिक करुन वाचा उष्ट्रासन संदर्भातील अधिक माहिती
सेतुबंधासन या आसनामुळे पोटावरील तसेच मांडय़ांमधील अतिरिक्त चरबी कमी होते व स्नायूंना बळकटी येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराची लवचिकतेतही सुधारणा होते.
येथे क्लिक करुन वाचा सेतूबंधासन संदर्भातील अधिक माहिती
कटी म्हणजे कंबर. कटी चक्रासन म्हणजे कंबरेतून शरीर फिरवणे होय. या आसनामुळे कंबरेला ताण बसून ती आणखी लवचिक बनते. या आसनामुळे अपचनाची तक्रार दूर होते.
येथे क्लिक करुन वाचा कटी चक्रासन संदर्भातील अधिक माहिती
या आसनात शरीर अध्र्या नांगराप्रमाणे दिसते. मधुमेह, उच्चरक्तदाब, मूळव्याध, बद्धकोष्ट इत्यादी आजार असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रकार केल्यास फायदा होतो.
येथे क्लिक करुन वाचा अर्ध हलासन संदर्भातील अधिक माहिती
सूर्यनमस्कार करताना जी आसने केली जातात, त्यापैकी हे एक आसन आहे. पाठ आणि पोट यांचे स्नायू मजबूत होण्यास या आसनाचा उपयोग होतो. या आसनाने पाठीचे सर्व स्नायू ताणले जातात. पाठीचा कणा मजबूत होतो.
येथे क्लिक करुन वाचा हस्तपादासन संदर्भातील अधिक माहिती
मासा पाण्यामध्ये तरंगताना जसा दिसतो, त्याप्रमाणे हे आसन करताना आपले शरीर दिसते. म्हणून या आसनाला मत्स्यासन असे म्हणतात. हे आसन नियमित केल्याने मान आणि खांद्यामध्ये जमलेला तणाव दूर होतो. या आसनात दीर्घ श्वास घेत राहिल्याने श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत होते.
येथे क्लिक करुन वाचा मत्स्यासन संदर्भातील अधिक माहिती
पश्चिम या शब्दाचा एक अर्थ आहे पाठीमागची बाजू. या आसनात मानेपासून पायांच्या घोटय़ापर्यंत शरीराच्या पाठीमागच्या भागास ताण मिळतो. त्यामुळे या आसनाला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. या आसनामुळे पोट व पाठीचे स्नायू बळकट होतात. पचनसंस्था कार्यक्षम होते.
येथे क्लिक करुन वाचा पश्चिमोत्तानासन संदर्भातील अधिक माहिती
अर्ध्या चक्रापणे दिसणारे हे आसन केल्याने पाठीचा कणा लवचिक होतो आणि कण्याला जोडलेले मज्जातंतू बळकट होतात. मान अधिक मजबूत होते आणि श्वसनक्रिया सुधारते.
येथे क्लिक करुन वाचा अर्धचक्रासन संदर्भातील अधिक माहिती