सकाळी उठल्यावर मन प्रसन्न आणि आनंदी असेल तर संपूर्ण दिवस मजेत आणि उत्साहात जातो. मात्र एखाद्या दिवशी झोप पूर्ण झाली नाही, तर संपूर्ण दिवस मरगळ जाणवते. त्यामुळे रात्री झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु, अनेक जणांना रात्री झोप न लागण्याची समस्या असते. अनेक उपाय करुनही काहींना झोप लागत नाही. त्यामुळे रात्री शांत झोप यावी यासाठी असे काही योग प्रकार आहेत, ज्यामुळे रात्री शांत झोप लागू शकते.
दरम्यान, निद्रानाश किंवा विस्कळीत झोप हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यच्यादृष्टीने त्रासदायक असते. त्यामुळे या समस्या टाळायच्या असतील तर योग करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.