Yoga To Boost Fertility: वंध्यत्व हा एक आव्हानात्मक प्रवास असू शकतो परंतु आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की वैद्यकीय उपचारांसह, तुमच्या जीवनशैलीत योगासनांचा समावेश केल्यास यातून बराच फायदा होऊ शकतो. योगामुळे आपल्याला विविध रूपात लाभ होऊ शकतात, यातील मुख्य फायदे म्हणजे तणाव कमी करणे, रक्ताभिसरण सुधारणे आणि लवचिकता वाढवणे, या तिन्ही बाबी वंध्यत्वाच्या लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत, डॉ. गीतिका सूद, डेव्हलपमेंटल ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि अपोलो क्रॅडल अँड चिल्ड्रन हॉस्पिटलमधील नवजात शिशूंच्या प्रमाणित थेरपिस्ट यांनी सांगितले की, “तणाव प्रजननक्षमता कमी करू शकतो आणि ओव्हुलेशन आणि अंड्याच्या गुणवत्तेत व्यत्यय आणू शकतो. काही आसनांमुळे अशा स्थितीत आराम मिळतो, तसेच मूड सुधारून तणाव कमी करण्यात मदत होऊ शकते.
योगामुळे पेल्विक क्षेत्रामध्ये रक्त प्रवाह वाढवून रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत होते जे निरोगी पुनरुत्पादक अवयवांसाठी आवश्यक आहे आणि परिणामी प्रजनन क्षमता सुधारते. उष्ट्रासन, पश्चिमोत्तन आसन, भद्रकोनासन आणि हस्तपादासन यांसारख्या आसनांच्या मदतीने पेल्विक स्नायू आणि हाडांची लवचिकता वाढण्यास मदत होते. यामुळे केवळ निरोगी गर्भधारणाच नाही तर सहज आणि नैसर्गिक प्रसूतीसाठी हातभार लागू शकतो. गर्भारपणात मळमळ आणि थकवा यासारख्या त्रासांपासूनही योगामुळे सुटका मिळू शकते.
“प्राणायामाचा नियमित सराव डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो. तणाव आणि चिंता दूर करणारा प्राणायाम मन आणि शरीर शांत होण्यास मदत करतो ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. दररोज २० मिनिटे ध्यान केल्याने जोडप्यांना अमर्याद फायदे मिळतात.”
तज्ज्ञांनी वंध्यत्वावर मात करण्यासाठी सुचवलेल्या तीन योगासनांची प्रक्रिया व माहिती इथे पाहूया…
बटरफ्लाय पोज
बटरफ्लाय पोज, ज्याला बद्ध कोनासन असेही म्हणतात, ही एक सौम्य परंतु शक्तिशाली पोझ आहे जी पुनरुत्पादक अवयवांना टार्गेट करते व पेल्विक भागात रक्त प्रवाह उत्तेजित करते.
हे करण्यासाठी, जमिनीवर बसा, तुमचे गुडघे वाकवा आणि तुमच्या पायाचे तळवे एकत्र आणा, तुमचे गुडघे बाहेरच्या बाजूला खाली येऊ द्या. तुमचे पाय धरा आणि फुलपाखराच्या पंखांसारखे तुमचे पाय हळूवारपणे खाली वरकरा .
या आसनामुळे नितंबाचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते, मांड्या आतील बाजू ताणल्या जातात आणि अंडाशय आणि प्रोस्टेट ग्रंथी उत्तेजित होतात. नियमित सराव पेल्विक भागातील रक्ताभिसरण सुधारू शकतो, हार्मोन्स संतुलित करू शकतो आणि प्रजनन क्षमता वाढवू शकतो.
लोटस पोझ
लोटस पोज, किंवा पद्मासन, एक बसलेली मुद्रा आहे जी मन आणि शरीर शांत करण्यासाठी ओळखली जाते. त्याचा सराव करण्यासाठी, जमिनीवर बसा, मांडी घालून पाय विरुद्ध मांडीवर ठेवा. हे आसन तणाव कमी करण्यास, पेल्विक मधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. लोटस पोझ हार्मोनल असंतुलन दूर करू शकते. आवश्यक असल्यास हे आसन करताना बसण्यासाठी उशीचा वापर करावा.
कॅमल पोज
उत्साहवर्धक कॅमल पोज किंवा उस्ट्रासन हे एक स्फूर्तिदायक बॅकबेंड आहे जे पोटाच्या भागासह संपूर्ण समोरच्या शरीराला ताणते. ते सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी, जमिनीवर गुडघे टेकून, आधारासाठी तुमचे हात तुमच्या पाठीच्या खालच्या बाजूला ठेवा आणि तुमचे नितंब पुढे ढकलताना हळूवारपणे पाठीची कमान करा.
हे आसन पुनरुत्पादक अवयवांना उत्तेजित करण्यास मदत करते, पेल्विकमध्ये रक्त प्रवाह वाढवते आणि पाठ आणि खांद्याचा ताण कमी करते. हे योगासन हार्मोनल संतुलन वाढवून प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करू शकते.
(टीप: वरील लेख माहितीपर आहे, आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या, योगासने करताना प्रशिक्षित तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करून घ्या)