International Yoga Day 2024 : अनेक लोक सध्या पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. यावर विविध प्रकारचे घरगुती उपाय केले जातात, मात्र त्यानंतरही काही फरक पडत नाही. अनेक जण पांढरे केस लपवण्यासाठी केस कलर करतात, पण तो कलर काही दिवसांनी निघून जातो आणि केसही खूप खराब होतात. त्यामुळे केस काळे करणे किंवा घरगुती उपाय करणे हा पांढऱ्या केसांवर कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही; पण योगासने पांढऱ्या केसांवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतात. होय, तुम्ही रोज योगासने केल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. कारण जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा तुमच्या टाळूमध्ये रक्ताभिसरण शक्ती वाढते, केसांची छिद्रे उघडतात आणि ऑक्सिजन सहज केसांपर्यंत पोहोचते. यामुळे केसांची वाढ होते आणि पांढरे केस काळे राहण्यास मदत होते.

राखाडी आणि पांढऱ्या झालेल्या केसांसाठी प्रभावी योगासन

उत्तानासन

पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही उत्तानासन करू शकता. केस गळणे कमी करण्यासाठीदेखील हा योगा प्रकार फायदेशीर आहे. या योगा प्रकारात पाठ आणि पाय जमिनीच्या दिशेने झुकवले जाते, ज्यामुळे संपूर्ण शरीर पुढे वाकते. यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण शक्ती वाढते आणि ऑक्सिजन आणि पोषक घटक केसांपर्यंत पोहोचतात. हे योगासन मन शांत करण्यास मदत करते, ज्यामुळे तणाव आणि सौम्य नैराश्यापासून आराम मिळतो, जे खराब केसांच्या आरोग्यासाठी प्रमुख घटक आहेत. यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते आणि तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतात. हा योगाप्रकार करण्यासाठी फॉलो करा खालील स्पेप्स

How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

Vat Purnima 2024 : ‘देव बनवतो साताजन्माची गाठ…’ वटपौर्णिमेनिमित्त तुमच्या अहोंसाठी खास उखाणे, पाहा लिस्ट

१) ताठ उभे राहा, यानंतर डोकं जमिनीच्या दिशेने करून वाका.
२) दोन्ही हातांच्या तळव्याने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
३) यादरम्यान डोके शक्य तितके खाली ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून डोके दोन्ही पायांच्या अंतराला स्पर्श करू शकेल.
४) पाठीचा कणा सरळ ठेवा आणि पायांमध्ये दोन इंच अंतर ठेवा, जेणेकरून दोन्ही पायांवर वजन समान येईल.
५) श्वास घ्या आणि आपले हात जमिनीवर शक्य तितके टेकवण्याचा प्रयत्न करा.
६) यानंतर श्वास सोडत शरीराला कमरेपासून वर खेचा आणि पाठीमागचा भाग सपाट ठेवून नितंबांपासून पुढे वाकवा. नंतर, हळू हळू आपल्या पायांच्या दिशेने खाली पुन्हा वाका.

Uttanasana
Uttanasana

बालासना

पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही बालासन करू शकता. असे केल्याने केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि केस मुळापासून काळे होतात. याशिवाय, त्याची खास गोष्ट म्हणजे, यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होते. हे कोलेजनचे नुकसान टाळते आणि केस काळे होण्यास मदत करते. हा योगाप्रकार करण्यासाठी फॉलो करा खालील स्पेप्स

१) दोन्ही पाय उटल्या दिशेने फोल्ड करून बसा, त्यानंतर तोंड हळहळू जमिनीच्या दिशेने वाकवा.
२) यानंतर दोन्ही हात पायाला टच करा, नंतर आपले डोके पूर्णपणे जमिनीवर चिकटवा.
३) श्वास आत बाहेर करत स्नायूंवर ताण येईल अशाप्रकारे हा योगा प्रकार रोज २० मिनिटे करा.

Balasana Yoga Pose
Balasana Yoga Pose

अशाप्रकारे ही दोन योगासने नियमित केल्यास केस पांढरे होण्याची समस्या टाळता येते. तसेच, याने केस गळण्यासह टाळूशी संबंधित अनेक समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.