International Yoga Day : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. नियमित व्यायाम करणे, योगा करणे आणि पोषक आहार घेणे गरजेचा आहे. योगासने तर निरोगी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तुम्ही नियमित योगा करता का? जर हो तर तुम्ही योगाभ्यासाला सुरुवात करण्यापू्र्वी काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून योगाभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याविषयी सांगितले आहे. आज आपण त्या गोष्टी कोणत्या, याविषयी जाणून घेणार आहोत.

व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

१. योगासने रिकाम्या पोटी करा – जेवण आणि योगाभ्यासामध्ये किमान ३ तासांचे अंतर असावे.

२. योगाभ्यासाची सुरुवात प्रार्थनेपासून करावी.

३. योगासने करण्यापूर्वी वॉर्मअप नक्की करावा.

४. योगासने करून झाली की शवासन करणे टाळू नका.

५. कोणतेही आसन करताना शरीरावर जोर देऊन करू नका. सुरुवात सावकाश करा.

६. योगाभ्यास करताना तुमच्या श्वासांवर लक्ष्य केंद्रीत करा.

७. नेहमी स्वच्छ व हवेशीर जागेत योगाभ्यास करा.

हेही वाचा :

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : चार मित्र, दोन बाईक्स अन् एक लाख अंतराची मोटरबाईक राईड! कोण होते भारतातील पहिले रायडर्स पाहा

yogamarathi_ या इन्स्टाग्रा अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सशक्त व लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत व प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य हे सर्व आपल्याला योगाभ्यासाच्या नियमित सरावाने प्राप्त होऊ शकते.
काही व्हिडीओमध्ये सांगितलेल्या गोष्टी लक्ष्यात ठेवून आजपासूनच योगाभ्यासाला सुरुवात करा.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुमचे खुप छान योगा आहेत. मी खुप फॉलो करतो,, चांगला बदल ही झाला आहे..धन्यवादह” तर एका युजरने विचारलेय, “हॅलो ताई ,माझे सिजेरिंग झाले आहे व ८ महिन्याचे बाळ आहे सिजर मुळे पोट खुप वाढले आहे व स्तन पण वाढले आहेत तर त्यासाठी कोणता योगा करायला हवा, मार्गदर्शन करावे.

मृणालिनी या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून योगाचे वेगवेगळे प्रकार सांगतात आणि त्याविषयी सविस्तर माहिती देतात. त्या अनेक फायदेशीर योगा करून दाखतवात. अनेक युजर्स त्यांना इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या त्यांच्या व्हिडीओवर युजर्स उत्तम प्रतिसाद देतात. काही युजर्स त्यांना प्रश्न विचारत शंका दूर करतात.