भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) लोकांसाठी अनेक योजना आणते. ज्यामध्ये लोकांना गुंतवणूक करून चांगला फायदा मिळतो. येथे लोकांना विम्याबरोबरच चांगला निधीही मिळतो. तुम्‍हाला तुमच्‍या मुलासाठी LIC मध्‍ये गुंतवणूक करायची असेल, जेणेकरून त्‍याचे भवितव्‍य सुरक्षित होईल किंवा त्‍याला नोकरी मिळेपर्यंत अधिक पैसे मिळू शकतील, तर येथे चिल्ड्रेन मनी बॅक प्‍लॅन आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

तुम्हीही तुमच्या मुलासाठी या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर गुंतवणूक करण्यास उशीर करू नये. आयुर्विमा महामंडळाची नवीन चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन पॉलिसी २५ वर्षांसाठी घेतली जाते. यामध्ये, मॅच्युरिटी रक्कम तुम्हाला हप्त्यात दिली जाते. तुमचे मूल १८ वर्षांचे असताना पहिल्यांदा, दुसऱ्यांदा २० वर्षांचे झाल्यावर आणि तिसर्‍यांदा २२ वर्षांचे झाल्यावर दिले जाते. या योजनेंतर्गत बोनस पण मिळतो. आयुर्विमाधारकाला विम्याच्या रकमेच्या २०-२० टक्के रक्कम मनी बॅक टॅक्स म्हणून मिळते. यासोबतच मूल २५ वर्षांचे झाल्यावर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. उर्वरित ४० टक्के रकमेसोबत बोनसही दिला जातो. म्हणजेच, जर एखाद्याने या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर लवकरच जास्तीत जास्त रक्कम मिळू शकते.

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

Aadhaar Card: लग्नानंतर आधार कार्डवरील आडनावात बदल कसा कराल? जाणून घ्या प्रोसेस

पॉलिसी घेण्याची वयोमर्यादा शून्य ते १२ वर्षे आहे. ६० टक्के रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते आणि ४० टक्के रक्कम मुदतपूर्तीच्या वेळी बोनससह दिली जाते. या अंतर्गत,१ लाख रुपयांचा किमान विमा घेऊ शकता. तर कमाल मर्यादा नाही. हप्ते न भरल्यास, व्याजासह एकरकमी रक्कम दिली जाते. या पॉलिसी अंतर्गत, जर कोणी दररोज १५० रुपयांची बचत करत असेल, तर विम्याचा प्रीमियम वार्षिक ५५ हजार रुपये दिला जातो. म्हणजेच ३६५ दिवसांनुसार तुम्हाला २५ वर्षांत एकूण १४ लाख रुपये जमा करावे लागतील. तुम्ही १४ लाख रुपये जमा केल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला १९ लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला मध्येच पैसे घ्यायचे नसतील, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर बोनससह एकरकमी रक्कम दिली जाते.