गुगलकडून २०१७ मधल्या सर्वाधिक शोध घेतलेल्या आणि ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केली. ‘Google’s Year in Search 2017’ च्या यादीत सर्वाधिक ज्या मोबाईल फोनची माहिती शोधली गेली तो फोन होता, आयफोन ८ iPhone 8 आणि आयफोन X iPhone X. आयफोनच्या दशकपूर्तीनिमत्त अॅपलने आपले दमदार असे दोन महत्त्वाचे फोन लाँच केले. आपल्या युनिक फीचरमुळे हे दोन्ही फोन अॅपलप्रेमी तसे इतर मोबाईल युजरच्या कुतूहलाचा विषय ठरले. त्यामुळे अर्थात या फोनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकांनी त्याचा सर्वाधिक शोध घेतला.
जाणून घ्या २०१७मध्ये भारतीयांनी गुगलवर काय शोधले?
त्यामुळे २०१७ च्या सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या गुगलच्या यादीत आयफोन ८ आणि आयफोन X हे अनुक्रमे एक आणि दोन क्रमांकावर होते. यानंतर ‘Nintendo Switch’ या गेमिंग डिव्हाइसबद्दल जास्त शोध घेतला गेला. पण अॅपलची प्रतिस्पर्धी कंपनी सॅमसंगचा फोन मात्र या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. या वर्षात मोबाईल जगतात पुन:पदार्पण केलेल्या नोकिया कंपनीचे दोन फोनही गुगलच्या यादीत पहिल्या दहामध्ये होते. यात ‘नोकिया ३३१०’ आणि ‘नोकिया ६’ हे फोन गुगलच्या यादीत अनुक्रमे सहाव्या आणि दहाव्या क्रमांकावर होते.