IRCTC Package: आयआरसीटीसीतर्फे एकीकडे स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून देशात पर्यटन आणि धार्मिक स्थळी फिरण्यासाठी खास पॅकेज आणले जात आहे आणि दुसरीकडे हवाई टूर पॅकेज देखील लॉन्च केले जात आहे. दरम्यान, आता आयआरसीटीसीने फिरण्यासाठी लडाख व्हाया नवी दिल्लीचे हवाई टूर पॅकेज आणले आहे. या प्रवास दौऱ्याची सुरूवात १९ मे पासून सुरू होईल २६ मे पर्यंत संपेल. हे टूर पॅकेज ०७ आणि ०८ दिवसांसाठी लॉन्च केले आहे.
या पर्यटन स्थळी देऊ शकता भेट
या प्रवास दौऱ्यामध्ये लेहमध्ये हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयीसोबत स्थानिक ठिकाणांची सैर करण्याची व्यवस्था केली जाईल. यामध्ये शाम व्हॅलीमध्ये शांतिस्तूप, लेह पॅलेस, हॉल ऑफ फेम, पत्थर साहिब, गुरुद्वारा, मॅग्नेटिक हिल, नुब्रा व्हॅलीमध्ये स्थित कँपमध्ये नाईट स्टे या सुविधा मिळतील. यासोबत डिस्किट आणि हुंडर गावात फिरता येईल आणि तुर्तुकमध्ये सियाचिन वॉर मेमोरिअल, थांग झिरो पॉईंट आणि पँगॉन्गमध्ये प्रसिद्ध पँगॉन्ग धबधबा,थिक्से मठ, शेय पॅलेस आणि ड्राक व्हाईट लोटस स्कूल ( प्रसिद्ध रँचोची शाळा जी थ्री इडियट चित्रपटामध्ये दाखवली आहे) फिरता येईल.
टूर पॅकेजमध्ये मिळणार सुविधा
या हवाई टूर पॅकेजमध्ये लखनऊ ते लेह व्हाया नवी दिल्ली( तेजस एक्सप्रेस)द्वारे जाण्या आणि येण्याची व्यवस्था केली जाईल. जाण्याची किंवा ये्ण्याचा हवाई प्रवास ( दिल्ली ते लेह), थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, स्थानिक ठिकाणांची सैर करण्यासाठी वाहनाची सौय आणि जेवणासाठी भारतीय पद्धतीचे जेवण( ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर) ही सर्व व्यवस्था आयआरसीटीसी द्वारे केली जाणार आहे.
हेही वाचा – IRCTC ने आणले भन्नाट टूर पॅकेज! उन्हाळ्यात शिमला-कुल्लू-मनाली फिरण्याची संधी
टूर पॅकेजचे भाडे
या टूर पॅकेजमध्ये एका व्यक्तीच्या राहण्याचा खर्च ५३,८०० रुपये प्रत्येकी येईल. जर दोन व्यक्तींसाठी एकत्र राहण्याचे पॅकेज घेतल्यास खर्च ४३८५० रुपये प्रति व्यक्ती येईल. जर तीन व्यक्तींसाठी एकत्र राहण्याचे पॅकेज घेतल्यास येणारा खर्च ४७१०० रुपये प्रति व्यक्ती येईल. लहान मुलांसाठी बेडसहीत पॅकेज घेतल्यास ४४८०० रुपये आणि बेडशिवाय पॅकेज घेतल्यास ४०९५० प्रति व्यक्ती खर्च येईल.
हेही वाचा- IRCTC Tour Plan: यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरा श्रीनगर! कमी खर्चात मिळतेय विमानातून फिरण्याची संधी
असे करा पॅकेज बुक
IRCTCच्या उत्तर क्षेत्रामध्ये मुख्य क्षेत्रीय प्रबंधक अजीत कुमार सिन्हा यांनी या प्रवासासाठी बुकिंग करण्यासाठी पर्यटनभवन, गोमती नगर, लखनऊ किंवा कानपूर येथील आयआरसीटीसीच्या कार्यालयला भेट देऊन किंवा आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन बुक करू शकता. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी दिलेल्या मोबाईलनंबरवर संपर्क करू शकता. लखनऊ – ८२८७९३०९११/ ८३८७९३०९०२, कानपूर – ८५९५९२४२९८/ ८२८७९३०९३०.