एप्रिल महिन्यापासून भारतात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक लोक थंड ठिकाणी फिरण्याचे बेत आखण्यात गुंतले आहेत. जेव्हा बर्फाच्छादित पर्वतरांगाचा उल्लेख येतो तेव्हा पहिला विचार येतो काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या ठिकाणांचा. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही अशा कडक उन्हात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या स्वस्त पॅकेजबद्दल सांगणार आहोत. IRCTC ने काश्मीरचे अतिशय स्वस्त टूर पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये तुम्हाला श्रीनगर, सोनमर्ग, पहलगाम आणि गुलमर्ग या ठिकाणाी भेट देऊ शकता.
काश्मीर टूर पॅकेज
IRCTC ने या पॅकेजला इचँन्टिंग कश्मीर(Enchanting Kashmir )असे नाव दिले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला काश्मीरमध्ये ५ रात्री आणि ६ दिवसांसाठी अतिशय स्वस्त पॅकेजमध्ये फिरका येणार आहे. या दौऱ्यात पर्यटकांना गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर आणि सोनमर्ग येथे नेले जाईल. ही टूर नवी दिल्ली विमानतळावरून सुरू होईल, इथून पर्यटक श्रीनगरला पोहोचू शकतात.
कुठे फिरु शकता
श्रीनगरमध्ये उतरल्यानंतर पर्यटकांना हॉटेलमध्ये नेले जाईल. संध्याकाळी मुघल गार्डनची फेरफटका मारण्यात येणार आहे. रात्री हॉटेलमध्ये परतताना पर्यटक रात्रीचे जेवण घेतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रीनगरहून सोनमर्गसाठी रवाना होईल. सोनमर्ग समुद्रसपाटीपासून २,८०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे प्रवासी थजवास ग्लेशियरलाही भेट देऊ शकतात.
हेही वाचा : दक्षिण भारत प्रवासासाठी IRCTCचे भन्नाट टूर पॅकेज, पैसे भरण्यासाठी मिळणार EMIची सुविधा!
कधी सुरू होईल ही यात्रा आणि किती खर्च येईल
टूरच्या तारखा ०५ मे २०२३, २० मे २०२३, २७ मे २०२३, २८ मे २०२३,०३ जून २०२३, १० जून २०२३, ११ जून २०२३ आणि १७ जून २०२३ अशा असतील. तुम्ही अविवाहित असाल तर खर्च ४९७४० रुपये होईल, तुम्ही जोडपे असल्यास प्रति व्यक्ती खर्च ३२,०३०,रुपये असेल, तीन लोकांसाठी प्रति व्यक्ती खर्च ३१,१०१० रुपये असेल. जर तुम्ही मुलांसह (५-११ वर्ष) बेड घेतला तर त्याचा खर्च २८,०१० रुपये असेल, जर तुम्ही मुलांसोबत बेडशिवाय पॅकेज घेतले तर त्याचा खर्च २४२६० रुपये होईल आणि मुलांसोबत (२ ते ४ वर्षे) बेड शिवाय पॅकेज घेतल्यास त्याची किंमत १४,९६० रुपये येईल.
हेही वाचा : चार दिवस फिनलँडमध्ये फिरा, आनंदी कसे रहावे शिका सर्व काही मोफत! फक्त अट इतकीच आहे की…
पॅकेजमध्ये समाविष्ट इतर गोष्टी
गो एअरवर परतीचे विमान भाडे (दिल्ली – श्रीनगर – दिल्ली).
एसी कार शेअरिंग तत्त्वावर दिली जाईल.
श्रीनगर आणि पहलगाममध्ये राहण्याची सोय
रात्रीचा मुक्काम हाऊस बोटमध्ये
दल सरोवरात शिकारा राइड
5 नाश्ता, 5 रात्रीचे जेवण
सामान्य विमा