IRCTC Shimla Kullu Manali Tour Package: तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हिमाचल प्रदेशामध्ये फिरण्याचा प्लॅन करत आहात का, मग तुमच्यासाठी IRCTCने चांगले टुर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजतंर्गत तुम्ही शिमला, मनाली आणि कुल्लू या ठिकाणी फिरू शकता. हे टूर पॅकेज ९ दिवसांचे असणार आहे. या टूर पॅकेजतंर्गत आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना हिमाचल प्रदेशामधील थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. विशेष म्हणजे आयआरसीटीसी पर्यटनाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या टूर पॅकेजतंर्गत सादर करत आहे. या टूर पॅकेजतंर्गत प्रवासी स्वस्तामध्ये देश आणि विदेशात प्रवास करण्याची संधी देऊ शकतात.
१३ मेला सुरू होतेय टूर पॅकेज
IRCTCमध्ये शिमला, कुल्लू आणि मनाली टूर पॅकेज १३ मे सुरू होत आहे. या टूर पॅकेजमध्ये प्रवास कोईंबतूर एअरपोर्टपासून होत आहे. हे हवाई टूर पॅकेज आहे. या टूर पॅकेजसाठी स्पेशल विमान प्रवास करता येणार आहे. हे टूर पॅकेज ७ रात्री आणि ८ दिवसांचे आहे आणि जर तुम्ही टूर पॅकेजमध्ये ३ लोकांना एकत्र प्रवास करता येऊ शकते आणि प्रत्येक व्यक्तीला ४९,४०० रुपये द्यावी लागते.
हेही वाचा – IRCTC Tour Plan: यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरा श्रीनगर! कमी खर्चात मिळतेय विमानातून फिरण्याची संधी
पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत शिमला, मनाली आणि कुल्लू
या टूर पॅकेजतंर्गत प्रवाशांच्या ३० सीट उपलब्ध आहे. जर तुम्ही या टूर पॅकेजमध्ये एकटे प्रवास करत असाल तर प्रती व्यक्ती ६६,२०० रुपये भरावे लागते. तेच जर तुम्ही दोन व्यक्तींना एकत्र प्रवास करत असाल तर प्रति व्यक्ती भाडे ५०,५५० रुपये भाडे द्यावे लागेल. या टूर पॅकेजमध्ये मुलांसाठी वेगळे भाडे भरावे लागेल.
हेही वाचा – IRCTC Kerala Tour Package: केरळमध्ये सुट्टीचा घ्या आनंद, फक्त ८००० रुपयांमध्ये फिरू शकता अनेक ठिकाणे
IRCTC च्या या टूर पॅकेजबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी आणि ते बुक करण्यासाठी, तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था IRCTC कडून केली जाणार आहे. असं असलं तरी, उन्हाळ्यात बहुतेक पर्यटक शिमला, मनाली आणि कुल्लू येथे भेट देण्यासाठी येतात. हे तिन्ही हिल स्टेशन्स अतिशय सुंदर आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेत.